Viral News: सतत मोबाईलच्या वापराने नजर कमजोर झालीय? या कार्पेटमध्येच लपलाय एक मोबाईल, शोधा लेकहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:38 IST2022-03-04T17:37:28+5:302022-03-04T17:38:23+5:30
अनेकदा तुमच्या समोर एखादी वस्तू असते, पण तुम्हाला ती दिसत नाही.

Viral News: सतत मोबाईलच्या वापराने नजर कमजोर झालीय? या कार्पेटमध्येच लपलाय एक मोबाईल, शोधा लेकहो
सोशल मीडियावर दररोज हजारो फोटो व्हायरल होतात. अनेकदा जुनी छायाचित्रेही पुन्हा व्हायरल होतात. काही छायाचित्रे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल. आजही एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक कार्पेट दिसत आहे, ज्यावर एक फोन लपलेला आहे. फार कमी लोकांना या फोटोतील फोन शोधण्यात यश आले आहे.
तुम्हाला दिसतो का फोन ?
फोटोमध्ये पाहिले जाऊ शकते की, कार्पेटवर एक टेबल आहे, यात एक फोन लपलेला आहे. अतिशय तीक्ष्ण दृष्टी असलेल्या व्यक्तींना या फोटोतील मोबाईल शोधता येईल. तुमची दृष्टी तीक्ष्ण असेल, तर तुम्हालाही कार्पेटमध्ये लपलेला फोन नक्कीच सापडेल. हा फोटो 2016 पासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो फेसबुकवर Jei Yah Mei नावाच्या युजरने शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला सुमारे 1 लाख 52 हजार लोकांनी लाईक केले आहे, तर हा फोटो 22 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केला आहे.
या ठिकाणी आहे फोन...
कार्पेटमध्ये लपलेला फोन शोधूनही सापडत नसेल, तर आम्ही तुम्हाला फोन कुठे आहे, ते सांगू. मोबाईलचे मागील कव्हर कार्पेटच्या डिझाईन प्रमाणेच असल्याने मोबाईल सहज दिसणार नाही. तर, हा फोन कार्पेटवर ठेवलेल्या टेबलच्या उजव्या बाजूला ठेवलेला आहे. बारीक नजरेने पाहिल्यास तुम्हाला हा फोन दिसेल.