शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलासाठी बहिणीने चालत्या ट्रेनमधून मारली उडी अन्.., रेल्वे प्रवासात वाईट अनुभव आलेल्या नेटकऱ्याची Viral पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 14:11 IST

सध्या सोशल मीडियावर एका यूजरने प्रवासी ट्रेनमधील काही फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान त्याला आलेला थरारक अनुभव त्याने इतर लोकांसोबत शेअर केलाय.

Social Viral : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये त्याच्या बहिणीला चढता आलं नाही. कशी-बशी ती आतमध्ये आली पण तिचा लहान मुलगा रेल्वे फलाटावरच राहिला. दरम्यान, एका एसी कोचमधून प्रवास करताना आलेला अनुभव एका तरूणाने  सोशल मीडियावर व्यक्त होत सांगितला. त्यासोबतच या तरूणाने ट्रेनच्या एंट्री गेटचा फोटो शेअर करत हा सगळा प्रकार घडल्याचं कारणंही सांगितलं. या व्हायरल फोटोमध्ये एसी ट्रेनच्या दरवाज्यापर्यंत प्रवासी बसलेले दिसतायत. या गर्दीमुळे त्याच्या बहिणीला ट्रेनमध्ये चढणं जमलं नाही आणि नाहक त्रास सहन करावा लागला. पण तिचं लहान लेकरू बाहेरच राहिलं. 

रचित जैन असं या तरूणाचं नाव आहे. त्याचबरोबर त्याने लिहलंय की,  आपल्या मुलांसाठी माझ्या बहिणीला चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याची वेळ आली. त्यामुळे तिला दुखापतही झाली आहे. आरामदायी प्रवास करण्यासाठी पैसे भरून सुद्धा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर ही एक चिंताजनक बाब आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे शौचालयासारख्या सुविधांचा वापर त्यांना करता येत नाही, या मुद्यांकडे रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी तरूणाने केलेली पोस्ट तुफान व्हायरल होतेय. 

या फोटोमधून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, फुकट्या प्रवाशांमुळे ही सर्व स्थिती निर्माण झाली आहे. ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता रेल्वे प्रशासनाने यावर ठोस पावले उचलावी असं या तरूणाचं म्हणणं आहे. ट्रेनमधील प्रवाशांच्या आरामदायी आणि सुखकर प्रवासाकरिता त्वरित कारवाई करा, अशी मागणी त्याने संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना केल्याची पाहायला मिळतेय.  सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाचा सूर उमटला आहे. 

या व्हायरल पोस्टवर काही नेटकऱ्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. ''गेल्या महिन्यात ट्रेनमधून प्रवास करताना मला देखील असा अनुभव आला, आणि आश्चर्याची बाब म्हणजे यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही'' अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.  तसेच दुसऱ्या यूजरने म्हटलंय, ''या गोष्टीकडे रेल्वेने पूर्णपणे कानाडोळा केला आहे''.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलrailwayरेल्वेSocial Mediaसोशल मीडिया