Video: बापरे! दैव बलवत्तर म्हणून बचावले, विना हेल्मेट दुचाकीवरून स्टंटबाजी करणं तरुणांना भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:35 IST2024-02-15T13:32:07+5:302024-02-15T13:35:48+5:30
हल्ली सोशल मीडिया हे माध्यम प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले आहे.

Video: बापरे! दैव बलवत्तर म्हणून बचावले, विना हेल्मेट दुचाकीवरून स्टंटबाजी करणं तरुणांना भोवलं
Social Viral : आपल्याकडे पोलिस नेहमी हेल्मेट वापरण्याचा सल्ला देत असतात. पण, काहीजण या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक अपघातात हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर बाईकवरुन स्टंट करणाऱ्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तरुणांनी हेल्मेट घातले नसल्याचे दिसत आहे.
अलिकडे सोशल मीडियावर तरुण बाईकवरुन अतरंगी पद्धतीने स्टंटबाजी करतानाच्या रिल्स मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असतात. त्यातून काही शिकण्यापेक्षा व्हिडीओच्या माध्यमातू प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंटबाज वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. बऱ्याचदा जीवावर बेतणारे साहस करून अनेकांनी आपला जीव देखील गमावलाय. पण त्यातून शहाणपणाचे धडे शिकण्यापेक्षा काही जण उत्साहाच्या भरात जीवघेणे स्टंट करतात आणि आयुष्याला मुकतात.
सध्या एक्सवर शेअर करण्यात आलेला अल्लड स्टंटबाजांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. विनाहेल्मेट दुचाकीवर स्टंटबाजी करणारे हे तीन जण चर्चेचा केंद्रबिंदु बनलेत. जीवाची पर्वा न करता भर रस्त्यावर या तरुणांनी दुचाकी सुसाट पळवली. नियंत्रण सुटल्याने अचानक बाईक रस्त्यालगत डिव्हाईडरला धडकते. गाडी पडल्यानंतर तिघेही तरुण जोरात आपटतात.
#SafeDriveSaveLife#ObeyTrafficRuls#WearHelmet#OverSpeed#NoTripleRiding#SafetyRuls#Awareness#Viral#Trending#Courage#Care#Commitment#yoursbdnpcpic.twitter.com/UbFM9OFMm8
— Bidhannagar Police (@bidhannagarpc) February 11, 2024
त्याच क्षणी त्यांच्या बाजुने ट्रक वेगाने जातो. रस्त्यापासून काही अंतरावर पडल्याने हे तिघे जण थोडक्यात बचावले. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अंगावर काटाच येईल. दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.