कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:40 IST2025-07-30T18:39:26+5:302025-07-30T18:40:39+5:30
बकरीच्या कळपावर एका कुत्र्याने हल्ला केला होता. यामध्ये एक बकरी जखमी झाली होती.

कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बरकीच्या कळपावर कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात बकरी गंभीर जखमी झाली होती. काही दिवसांनी या बकरीचा मृत्यू झाला. यानंतर आख्ख कुटुंब टेन्शनमध्ये आले होते.
झारखंड येथील टुंडीच्या पोखरिया येथे एका बकरीचा मृत्यू होताच गावात एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांच्या टोळीने बकरीवर हल्ला केला. त्यानंतर अचानक बकरीचा मृत्यू झाला, बकरीवर हल्ला ज्यावेळी झाला होता त्यावेळी सुमारे २० जणांनी त्या बकरीचे दूध प्यायले होते.
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला, १ ऑगस्टपासून लागू होणार; दंडही ठोठावला
बकरीचे दूध पिल्यानंतर, ज्यावेळी लोकांना कळले की बकरीचा मृत्यू कुत्र्याच्या चाव्यामुळे झाला. तेव्हा सर्वजण घाबरले. रेबीजचा संसर्ग होऊ शकतो अशी भीती सर्वांना वाटली. बकरीचे दूध पिणाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला.
सगळ्यांनी रेबिजच्या लसीची मागणी केली
दुसऱ्याच दिवशी २० जण रुग्णालयात दाखल झाले. लोकांनी या घटनेची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी याबाबत रुग्णांना समजावून सांगितले. 'जर दूध उकळून प्यायले तर त्यामुळे रेबीजचा संसर्ग होणार नाही', असं डॉक्टरांनी त्यांना सांगितले. पण गावकरी ऐकण्यास तयार नव्हते आणि त्यांनी रेबीजविरोधी लस देण्याचा आग्रह धरला.
अखेर गावकऱ्यांच्या आग्रहामुळे सर्व १७ जणांना रेबीजविरोधी लस देण्यात आली. सर्व लोक एकाच कुटुंबातील आहेत. दुसरीकडे, शहरात दररोज कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मोठ्या संख्येने लोक जखमी होत आहेत. दररोज ११० ते १२५ रुग्ण रेबीजविरोधी लसीकरण केंद्रात पोहोचत आहेत.
बकरीचा मृत्यू झाल्यानंतर लोकांना कळले
कुटुंबातील लोक बकरीचे दूध पीत असल्याचे सांगण्यात आले. गोटियामध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र राहत होते. बकरी अचानक मेली तेव्हा लोकांना धक्का बसला. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांच्या टोळीने बकरीवर हल्ला केला होता. त्यानंतर काही दिवसांनी बकरीचा मृत्यू झाला.
ज्यावेळी आजूबाजूच्या लोकांना हे कळले तेव्हा सर्वजण घाबरले. दूध पिणाऱ्या लोकांना गावातील लोकांनी रेबीजविरोधी लस घेण्यास सांगितले. अन्यथा त्यांना गावात येऊ नये अशी धमकी देण्यात आली. यामुळे लोक अधिकच अस्वस्थ झाले आणि त्यांनी लस घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.