एकाच्या हातावर तुरी देत दुसऱ्याला डेट करत होती मुलगी, प्रेमभंगातून वाद गेला विकोपाला, 'Video' होतोय व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:05 IST2024-01-12T14:03:52+5:302024-01-12T14:05:16+5:30

सोशल मीडियावर प्रेमप्रकरणातून एका मुलाने प्रेयसीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

A girl was dating another by giving a trumpet on one's hand, an argument broke out due to infidelity, 'Video' is going viral | एकाच्या हातावर तुरी देत दुसऱ्याला डेट करत होती मुलगी, प्रेमभंगातून वाद गेला विकोपाला, 'Video' होतोय व्हायरल 

एकाच्या हातावर तुरी देत दुसऱ्याला डेट करत होती मुलगी, प्रेमभंगातून वाद गेला विकोपाला, 'Video' होतोय व्हायरल 

Social Viral : चित्रपटातील प्रेम प्रकरणे त्यातील दृश्ये शिवाय प्रेमकथांचा विपरित परिणाम आजच्या युवा पिढीवर होताना दिसतोय. शिक्षण, करिअरच्या बाबतीत गांभीर्य बाळगण्यापेक्षा ही कोवळ्या वयातील मुले- मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. अगदी लहान वयातच घरातून पळून जायचे किंवा लग्न करुन संसार थाटाण्याचे स्वप्न ही मुले बघथ असतात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. 

सध्या सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. प्रेमप्रकरणातून आपल्या प्रेयसीला मुलगा मारहाण करताना दिसत आहे. 
 
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हे प्रेमी युगुल शाळेच्या गणवेशात दिसत आहेत. त्यांच्या सोबत इतरही मित्र- मैत्रिणीही असल्याचे दिसत आहे. आपल्या प्रियसीला दुसऱ्या मुलाबरोबर बोलताना पाहिल्यावर प्रियकराचा पारा चढला. या कारणावरुन दोघांमध्ये बाचाबाची होते आणि हा शाब्दिक वाद विकोपाला जातो. व्हिडीओत दिसणाऱ्या या प्रेमी युगुलांमधील वाद ताजा असतानाच रागावलेली मुलगी रस्त्यावर चालणाऱ्या दुसऱ्या मुलीला धक्का देते. त्यातूनच हा वाद पुढे उफाळल्याचे दिसत आहे. प्रेमभंग झालेला मुलगा धावता जातो आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण करतानाची दृ्श्ये कॅमेऱ्यात कौद करण्यात आली आहेत. व्हायरल व्हिडिओ अरुणाचल प्रदेशमधील असल्याचे समजते.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया केल्या आहेत.  एक्स( ट्विटर) अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी या तरुणांची कानउघडणी केली आहे. 

पाहा व्हिडिओ - 

Web Title: A girl was dating another by giving a trumpet on one's hand, an argument broke out due to infidelity, 'Video' is going viral