समोर दिसतोय घुबडांचा घोळका, त्यात लपलाय एक बोका; भलेभले थकले, आता तुम्ही तरी ओळखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 17:51 IST2022-09-13T17:49:31+5:302022-09-13T17:51:19+5:30
Optical Illusion: जर तुम्ही हे मांजर १० सेकंदात शोधले तर तुम्ही लपलेल्या वस्तू शोधण्य़ात माहिर आहात हे स्पष्ट होईल.

समोर दिसतोय घुबडांचा घोळका, त्यात लपलाय एक बोका; भलेभले थकले, आता तुम्ही तरी ओळखा
डोळ्यांनाही भ्रमित करणारे म्हणजेच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सध्या भलतेच ट्रेंडमध्ये असतात. आता एक असा फोटो आहे, ज्याने लोकांच्या डोक्याचे दही केलेले आहे. या फोटोत खूप सारी घुबड आहेत. त्यात खुठेतरी एक मांजर लपलेली आहे. त्या मांजराला शोधायचे आहे.
जर तुम्ही हे मांजर १० सेकंदात शोधले तर तुम्ही लपलेल्या वस्तू शोधण्य़ात माहिर आहात हे स्पष्ट होईल. तुम्हाला खरोखर मांजर शोधायचे असेल तर हे चित्र नीट निरखून पहा. कोणताही कोपरा सोडू नका. अर्थातच, लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. कारण लक्ष जरा जरी विचलित झाले तरी तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर असलेले मांजर देखील दिसणार नाही.
हा फोटो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो 2017 मध्ये ट्रान्ससेंड थायलंड या फेसबुक पेजने शेअर केला होता, तेव्हा खूप व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा हे चित्र लोकांच्या मनाचा ठाव घेत आहे. अनेक भली भली मंडळी आहेत त्यांना ही मांजर सापडली आहे. तुम्हाला सापडली का? कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा...