लेकीचा संसार मोडला, पण बापाने दिला धीर; घटस्फोटानंतर मुलगी ओझं नाही म्हणत कोर्टाबाहेरच केलं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:55 IST2026-04-06T09:48:52+5:302026-04-06T09:55:30+5:30

मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्या वडिलांनी आनंदात स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

A father bold move Celebrating a daughter divorce to break age old social barriers | लेकीचा संसार मोडला, पण बापाने दिला धीर; घटस्फोटानंतर मुलगी ओझं नाही म्हणत कोर्टाबाहेरच केलं सेलिब्रेशन

लेकीचा संसार मोडला, पण बापाने दिला धीर; घटस्फोटानंतर मुलगी ओझं नाही म्हणत कोर्टाबाहेरच केलं सेलिब्रेशन

Social Viral: भारतीय समाजात आजही मुलीचा घटस्फोट होणे ही गोष्ट दुःखद मानली जाते. मात्र, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका पित्याने या जुन्या विचारसरणीला फाटा दिला आहे. मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर दुःख व्यक्त करण्याऐवजी, एका निवृत्त न्यायाधीश वडिलांनी घरी तिचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात, पेढे वाटून आणि फटाके फोडून केले. या अनोख्या स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, या पित्याच्या कौतुक होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कंकरखेडा भागातील रहिवासी आणि निवृत्त न्यायाधीश डॉ. ज्ञानेंद्र शर्मा यांची मुलगी प्रणिता हिचे लग्न २०१८ मध्ये शाहजहानपूर येथील मेजर गौरव अग्निहोत्री यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाले होते. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, लग्नानंतर काही काळातच सासरच्या मंडळींकडून होणारा छळ आणि पती-पत्नीमधील वादांमुळे या नात्यात कटुता निर्माण झाली होती. प्रणिताने वाद मिटण्याचे अनेक प्रयत्न केले, पण छळ असह्य झाल्याने शेवटी तिने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला.

कोर्टाबाहेरच रंगला उत्सवाचा सोहळा

शनिवारी, ४ एप्रिल रोजी मेरठच्या कौटुंबिक न्यायालयाने प्रणिताच्या घटस्फोटावर  शिक्कामोर्तब केले. प्रदीर्घ कायदेशीर लढा जिंकल्यानंतर, जेव्हा प्रणिता कोर्टाबाहेर आली, तेव्हा तिच्या वडिलांनी आधीच ढोल-ताशांची व्यवस्था केली होती. "मुलगी जन्माला आली तेव्हा ढोल वाजवले होते, आज ती पुन्हा स्वतंत्र झाली आहे, म्हणून आजही ढोल वाजणार," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"मुलगी ही ओझं नाही"; पित्याची भूमिका

या निर्णयाबाबत बोलताना डॉ. शर्मा म्हणाले, "मुलगी ही मुलाप्रमाणेच कुटुंबाचा अविभाज्य भाग असते. गेल्या ६ वर्षांपासून ती सासरी प्रचंड मानसिक त्रासात होती. २०२२ मध्ये माझ्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, त्या दुःखातून सावरत असतानाच लेकीचा हा संघर्ष सुरू होता. मला माझ्या मुलीला रडताना बघायचे नव्हते. आज तिला त्या जाचातून मुक्ती मिळाली आहे, हा तिच्यासाठी नवीन जन्मच आहे."

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

घटस्फोटासारख्या विषयाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या घटनेतून समोर आला आहे. प्रत्येक मुलीला असे खंबीर कुटुंब मिळो, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. प्रणितानेही भावूक होत म्हटले की, माझ्या वडिलांनी मला प्रत्येक कठीण प्रसंगात साथ दिली. त्यांच्यामुळेच आज मी पुन्हा एकदा सन्मानाने जगण्यासाठी तयार झाली आहे."

Web Title : पिता ने बेटी के तलाक का जश्न मनाया, साबित किया वह बोझ नहीं।

Web Summary : उत्तर प्रदेश में एक पिता ने सामाजिक मानदंडों को तोड़ते हुए अपनी बेटी के तलाक का जश्न खुशी से मनाया, यह जोर देते हुए कि वह बोझ नहीं है। वैवाहिक मुद्दों के खिलाफ कानूनी लड़ाई खत्म होने के बाद उन्होंने संगीत और उत्सव के साथ घर पर उसका स्वागत किया, जिससे तलाक पर सकारात्मक दृष्टिकोण उजागर हुआ।

Web Title : Father celebrates daughter's divorce, proving she's not a burden.

Web Summary : Breaking societal norms, a father in Uttar Pradesh celebrated his daughter's divorce with joy, emphasizing she's not a burden. He welcomed her home with music and celebration after her legal battle against marital issues ended, highlighting a positive outlook on divorce.