जय शिवराय! हातात कुबड्या घेऊन रायगड सर करणारा मावळा, Video बघून अंगावर येईल काटा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 14:22 IST2024-04-10T14:20:33+5:302024-04-10T14:22:13+5:30
सध्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ओढ असणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आलाय.

जय शिवराय! हातात कुबड्या घेऊन रायगड सर करणारा मावळा, Video बघून अंगावर येईल काटा....
Social Viral : आपल्या पराक्रमाने दाहीदिशा उजळून टाकणारे तसेच हिंदु धर्माचे रक्षणकर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत. महारांच्या शौर्याचे साक्षीदार असणारे गडकिल्ले त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगतात. या गडकिल्ल्यांकडे नुसतं पाहिलं तरी अंगात एक अनोखी स्फूर्ती संचारते. याचा प्रत्यय एक व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल. सध्या सोशल मीडियावर महाराजांविषयी ओढ असणाऱ्या एका शिवप्रेमीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आलाय.
अलिकडेच सोशल मीडियावर महाराजांच्या गड-किल्ल्यांची महती सांगणारे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतात. महाराष्ट्रातील तरुणवर्गाचे किल्ल्यांची सफर करतानाचे किंवा त्याच्या संवर्धनाचे असंख्य व्हिडिओ वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत असतात. असे व्हिडिओ किंवा रिल्स पाहिल्यावर महाराजांच्या कार्याची आठवण होते. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक अपंग व्यक्ती हातात कुबड्या घेऊन किल्ला सर करताना दिसतोय. त्याच्या या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. amruta_thorat 1 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.
परिस्थितीसमोर हतबल न होता रायगड चढणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ पाहिल्यास कोणाचाही आत्मविश्वास बळकट होईल. शारिरिक व्यंगावर मात करत मोठ्या जिद्दीने हा व्यक्ती रायगडाच्या पायऱ्या चढत आहे. या ध्येयवेड्या शिवभक्ताचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् झालेत. संकटांना घाबरून न जाता निरडपणे आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा याची प्रेरणा हा व्हिडिओ बघितल्यास मिळेल.