शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! एका पाळीव श्वानाला डे केअरला पाठवण्यासाठी युवती दरमहिना भरते दीड लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:01 IST

ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावर लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली. एका श्वानावर इतका पैसा खर्च करणे खरेच गरजेचा आहे का असा प्रश्न काही लोक विचारतात तर काहींनी हे योग्य असल्याचं म्हटले.

चीनमधील एका घटनेने सगळ्यांनाच हैराण केले आहे. टाओटाओ नावाच्या युवती आणि तिच्याकडे असलेला ६ महिन्याच्या श्वान सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शांघाय येथे राहणाऱ्या युवतीने तिच्या पाळीव श्वानाला लग्झरी डॉग किंडरगार्टन पाठवले आहे आणि त्यासाठी तिला दर महिना १२ हजार युआन म्हणजेच १.६० लाख रूपये खर्च करावे लागतात.

टाओटाओने सांगितले की, मी नोकरीत खूप व्यस्त असते. त्यामुळे माझ्या श्वानाला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. जेणेकरून पाळीव श्वानाची देखभाल योग्यरितीने होऊ शकेल. हा माझ्यासाठी खर्च नाही तर पाळीव श्वानाच्या भल्यासाठी उचललेले आवश्यक पाऊल आहे असं तिने सांगितले.

श्वानाला शिकवली जाते शिस्त

रिपोर्टनुसार, डॉग किंडरगार्टन कुठलेही सामान्य डे केअर सेंटर नाही तर एक प्रिमियम सुविधा केंद्र आहे. जिथे श्वानांची पर्सनॅलिटी आणि टेम्परामेंट टेस्ट घेतली जाते जेणेकरून त्यांचा स्वभाव खूप चांगल्या रितीने समजू शकतो. त्याशिवाय बिहेवियर ट्रेनिंग दिली जाते. ज्यातून श्वानांचे भुंकणे आणि आक्रमकता हा स्वभाव कंट्रोल केला जाऊ शकतो. इतकेच नाही तर या श्वानांना इतर श्वानांसोबत खेळायचा, वेळ घालवायची संधी मिळते. ज्यातून त्यांची वर्तणूक चांगली होते. डेली बोर्डिंगसह पिकअप आणि ड्रॉप सुविधाही दिली जाते. मालक आणि श्वान यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी खास इंटरॅक्शन क्लासही असतो. जेवणाचा खर्च या पॅकेजमध्ये समाविष्ट नाही.

एका श्वानावर इतका खर्च खरेच गरजेचा?

दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावर लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली. एका श्वानावर इतका पैसा खर्च करणे खरेच गरजेचा आहे का असा प्रश्न काही लोक विचारतात तर काहींनी हे योग्य असल्याचं म्हटले. जर पाळीव श्वान कुटुंबाचा हिस्सा मानला जातो तर त्याच्या देखभालासाठी होणारा खर्च चुकीचा नाही असं काहींनी मत मांडले. हे प्रकरण एका श्वानापुरते मर्यादित नाही तर त्यातून बदलता विचार दिसून येतो. सध्याच्या काळात पाळीव प्राण्यासाठी लोकांचा असलेला दृष्टीकोन बदलत आहे. त्यांच्या देखभालीसाठी रोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Woman spends $2000 monthly for her dog's luxury daycare.

Web Summary : A Chinese woman spends a fortune on luxury daycare for her dog due to her busy work schedule. The daycare offers personality tests, behavior training, and socialization, reflecting a growing trend of prioritizing pet care. Some question the expense, while others see it as justified for a family member.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल