गळ्यात ठुशी, नाकात नथ, मनी माऊचा अस्सल मराठमोळा लूक; 'Video' पाहून तुम्हालाही वाटेल नवल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 12:15 IST2024-01-11T12:12:58+5:302024-01-11T12:15:17+5:30

मांजरीचा साज शृंगार पाहून तुम्ही तिच्या प्रेमातच पडाल. 

A cat maharashtrian marathi look video goes viral on social media  | गळ्यात ठुशी, नाकात नथ, मनी माऊचा अस्सल मराठमोळा लूक; 'Video' पाहून तुम्हालाही वाटेल नवल

गळ्यात ठुशी, नाकात नथ, मनी माऊचा अस्सल मराठमोळा लूक; 'Video' पाहून तुम्हालाही वाटेल नवल

Social Viral : आजकाल प्रत्येकाच्या घरी मांजर ही हमखास आढळून येते. आपण बऱ्याच जणांच्या घरी कुत्रा, मांजर यांसारखे पाळीव प्राणी पाळलेले असल्याचे पाहतो. त्यापैकी अनेकजण आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकतेच एका इंस्टाग्राम यूजरने सोशल मीडियावर त्याच्या मांजरीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मांजर प्रेमींना हा व्हिडीओ नक्कीच आवडेल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये चक्क मनी माऊला साज शृंगार करण्यात आलाय. या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिकंली आहेत. शिवाय मांजरीचा हा हटके लूक लोकांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय. अनेकदा आपण रिल्सवर किंवा समाज माध्यमांवर पाळीव प्राण्यांना वेगवेगळे कपडे घातल्याचे किंवा प्राण्यांच्या हुशारीचे दर्शन घडवणारे व्हिडीओ पाहिले असतीलच. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या माऊची बातच न्यारी आहे. पांढरा शुभ्र रंग, निळेशार डोळे त्याला साज श्रृंगाराची जोड देत नटलेली मांजर खूपच सुंदर दिसते आहे. 

व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाच्या मांजरीला मराठमोळा लूक देण्यात आलाय.  नाकात खड्यांची नथ, गळ्यात ठुशी तसंच कपाळावर चंद्रकोराची टिकली लावून या गोंडस मांजरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रीयन पेहराव करत मनी माऊ अगदी ऐटीत बसलेली दिसत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या गोड, गोंडस मांजरीचे लाड केल्याशिवाय तुम्हालाही राहवणार नाही. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मराठमोळ्या मनीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओवर, अंगबाई! तुम्ही पण एक किलोचा नेकलेस घातला का मनीला? काजळ लावायला पाहिजे होती मग लई भारी डोळे दिसत होते. अशा कमेंट्स काही यूजर्सनी केल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ - 

Web Title: A cat maharashtrian marathi look video goes viral on social media