डोकं खाजवा, उत्तर सांगा! मुलाने मुलीला तिचं नाव विचारलं, तिनं 311211 असं उत्तर दिलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 20:30 IST2023-01-16T20:29:45+5:302023-01-16T20:30:10+5:30
सोशल मीडिया हा माहितीचा भंडार आहे आणि याचा योग्य वापर केला तर आपल्याला बरीच माहिती सहज मिळू शकते, त्यातून इन्कन सोर्सही तयार करता येतो.

डोकं खाजवा, उत्तर सांगा! मुलाने मुलीला तिचं नाव विचारलं, तिनं 311211 असं उत्तर दिलं
सोशल मीडिया हा माहितीचा भंडार आहे आणि याचा योग्य वापर केला तर आपल्याला बरीच माहिती सहज मिळू शकते, त्यातून इन्कन सोर्सही तयार करता येतो. सोशल मीडियावर जगभरातील अनेक घटना आपल्याला चटकन कळतात... काही मजेशीर व्हिडीओ, फोटोंनी आपलं मनोरंजनही होत असतं... तर काही माहितींमधून आपल्या ज्ञानात भर पडत असते.. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोने सर्वांना डोकं खाजवायला लावलं आहे. नेहा गुप्ता नामक मुलीने हा फोटो इस्टा अकाऊंटवर पोस्ट केला आहे आणि त्यावरील प्रश्नाचे तिने उत्तर मागवले आहे...
या इस्टा स्टोरीवर तिने प्रश्न विचारला आहे की, एका मुलाने एका मुलीला तिचं नाव विचारलं. मुलीने 311211 असं उत्तर दिलं. मग त्या मुलीचं नाव काय झालं?
आता याचं उत्तर जाणून घेऊयात...
311211, या आकड्यांकडे नीट लक्ष दिलं तर यातून 'आशा' असं नाव त्या मुलीचं असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यांनी ते पटवूनही दिले आहे.