बांगड्या विकणाऱ्या महिलेची इंटरनेटवर हवा; फाडफाड इंग्रजी बोलताना पाहून नेटकरी अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:13 IST2024-02-07T13:11:25+5:302024-02-07T13:13:02+5:30
सध्या सोशल मीडियावर गोव्यातील एका काकूंचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

बांगड्या विकणाऱ्या महिलेची इंटरनेटवर हवा; फाडफाड इंग्रजी बोलताना पाहून नेटकरी अवाक्
Social Viral : अस्खलित इंग्रजी बोलत बांगड्या विकणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. लोकांचे लक्ष वेधून घेणारा हा व्हिडीओ गोव्यातील वागाटोर बीचचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला परदेशी पर्यटकाशी अस्खलित इंग्रजी बोलताना दिसतेय. जीवन कसेही असले तरी ते चांगले जगता आले पाहिजे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सांगतेय की मी खूप दिवसांपासून काम करत आहे. कोरोना महामारीनंतर समुद्रकिनाऱ्यावर फार मोठे बदल झाले. हा बीच काळ्या खडकांसाठी तसेच प्राचिन पाण्यासाठी ओळखला जातो. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यापासून दूर शांतता शोधणाऱ्या पर्यटकांमध्ये हा बीच लोकप्रिय आहे. समुद्रकिनाऱ्यावरील बदलत्या परिस्थितीबद्दल सुद्धा ही महिला इंग्रजीत सांगताना दिसते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या या महिलेचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, ज्ञान नाही असं देखील एका नेटकऱ्याने म्हटले आहे. काकूंची इंग्रजी बोलण्याची पद्धत अनेकांना आवडली असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.