शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Groom For Sale: 'या' शहरात भरला नवरदेवांचा बाजार; पदवीनुसार ठरवली जाते किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 11:26 IST

आजच्या एकविसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार सुरू आहेत.

मधुबनी  : आजच्या एकविसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार सुरू आहेत. अनेक भागात तर ऑनलाइन व्यवहाराशिवाय कोणतेच काम होत नाही. सर्व गरजू वस्तू ऑनलाइन खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत, यामध्ये नवरदेव विक्रीचा ऑनलाइन बाजार भरवला तर आश्चर्य होण्यासारखे काही नाही, कारण ही सत्य घटना आहे. अनेक ठिकाणी ऑनलाइन लग्न जमवली जातात यासाठी मराठी शादी डॉट कॉम आणि जीवनसाथी सारख्या सुविधा आजच्या धावपळीच्या जगात बाजारात आल्या आहेत. 

अनोख्या बाजाराची रंगली चर्चा 

दरम्यान, बिहारमधील मधुबनी येथे चक्क नवरदेवांचा बाजार भरवला जात असून वधू बनण्यासाठी तयार असलेल्या मुलींसाठी वरांचे चांगले पर्याय ठेवण्यात आले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे हा नवरदेवांचा बाजार एका पिंपळाच्या झाडाखाली भरला आहे, मात्र आपल्याला वाटेल तेव्हा नवरदेवाला घेऊन येता येणार नाही त्यासाठी काही अटी देखील आहेत.

हा बाजार केवळ ९ दिवस भरतो आणि ही प्रथा आजची नसून ही तब्बल ७०० वर्षांची जुनी परंपरा आहे. अर्थात हा बाजार बिहारच्या या भागात शतकानुशतके वर्षांपासून सुरू आहे. तेथील स्थानिक लोक या अनोख्या बाजाराला 'सौरभ सभा' असे म्हणतात. या सभेसाठी विविध जिल्ह्यातील ब्राम्हण समाजाचे लोक सहभागी होतात. खरं तर लोक त्यांच्या मुलीसाठी योग्य वराचे स्थळ शोधण्यासाठी इथे येत असतात. तर नवदेव आपल्या कुटुंबासह इथे हजेरी लावतात. प्रत्येक नवरदेवाची किंमत त्याच्या पार्श्वभूमीवर आणि शिक्षणानुसार ठरवली जाते. लग्न ठरण्याच्या आधी नवरदेवाची सर्व माहिती मागवली जाते आणि त्यात तो योग्य असेल तर या सभेत स्थान दिले जाते. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नBiharबिहारhusband and wifeपती- जोडीदार