शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:55 IST

सिंगापूरमध्ये एक ९१ वर्षीय वृद्धाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते वयस्कर आजोबा या वयातही १२ तास शौचालय साफ करण्याचे काम करतात. एका ऑस्ट्रेलियन प्रवाशाने त्यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आपल्याकडे ५०–५५ वर्षांचे वय झाले की आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे काम करण्यात अडचणी निर्माण होतात. सध्याचे बदललेले खाणे-पिणे आणि जीवनशैली याचा शरीरावर मोठा परिणाम होत आहे. पण, सध्या एका ९१ वर्षीय व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही की ते खरोखर ९१ वर्षांचे आहेत. एवढ्या वयातही हे आजोबा दररोज सिंगापूरमधील विमानतळावर तब्बल १२ तास काम करतात. ते शौचालय साफ करण्याचे काम करतात. हा व्हिडीओ एका ऑस्ट्रेलियन प्रवाशाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा

ऑस्ट्रेलिय प्रवाशाने लँगना हा ज्यावेळी सिंगापूर विमानतळावरील वॉशरुममध्ये गेला. त्यावेळी त्याला एक वयस्कर व्यक्ती दिसला. जास्त वय दिसणारा व्यक्ती काम करतोय हे पाहून त्याला धक्का बसला. यावेळी त्याने वृद्ध माणसाशी संवाद साधला. यावेळी त्या व्यक्तीने ९१ वर्षांचे असल्याचे सांगितले.

व्यायाम करत नाही, सामान्य आहार घेतो

लँग त्याला पाहून आश्चर्यचकित झाला. लँगने त्यांना त्यांच्या फिटनेसचे रहस्य विचारले. त्यावेळी त्या वृद्धाने सांगितले की, मी सामान्य आहार घेतो आणि कधीही व्यायाम करत नाही. यावर लँग आश्चर्यचकित झाला. त्यावेळी त्याने तुम्ही 'सुपरमॅन' आहात असे सांगितले.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आर. माधवननेही तो व्हिडीओ शेअर केला. नेटकरी या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, "तो तंदुरुस्त आहे कारण तो नेहमीच सक्रिय लोकांभोवती असतो. व्यायाम महत्त्वाचा नाही, तर आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. तो त्याचे काम आनंदाने करतो." दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, "आज इंटरनेटवर मी पाहिलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 91-Year-Old's Fitness Secret: Works 12 Hours Daily, Stuns All!

Web Summary : A 91-year-old man working 12 hours daily at Singapore airport is inspiring many. He cleans toilets and surprised an Australian traveler with his fitness. He claims his secret is a normal diet without exercise. The video went viral, with people praising his active and joyful lifestyle.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम