आठवी पास झोमॅटो डिलिव्हरी बॉयची संघर्षमय कहाणी, वाचाल तर कराल त्याचं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:31 IST2024-12-25T12:29:44+5:302024-12-25T12:31:14+5:30

Zomato Delivery Boy: दिल्लीत कडाक्याच्या थंडीत डिलिव्हरी एजंट शिवा सरकार काम करत होता, तेव्हाच कस्टमर हिमांशु बोहरानं त्याला आत बोलवलं आणि पाणीही दिलं.

8th pass Zomato delivery boy from Delhi struggles for his family | आठवी पास झोमॅटो डिलिव्हरी बॉयची संघर्षमय कहाणी, वाचाल तर कराल त्याचं कौतुक!

आठवी पास झोमॅटो डिलिव्हरी बॉयची संघर्षमय कहाणी, वाचाल तर कराल त्याचं कौतुक!

Zomato Delivery Boy: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या अनेक सक्सेस स्टोरी नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात हे तरूण कशाप्रकारे घर चालवण्यासाठी किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात हे समोर येतं. अशीच एक कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत डिलिव्हरी एजंट शिवा सरकार काम करत होता, तेव्हाच कस्टमर हिमांशु बोहरानं त्याला आत बोलवलं आणि पाणीही दिलं. इतक्या वेळात झोलेल्या संवादातून हिमांशुला शिवाची कहाणी समजली.

शिवा सरकारनं हिमांशुला आपली संघर्षमय कहाणी सांगितली. त्याने सांगितलं की, त्यानं आठव्या वर्गानंतर शाळा सोडून दिली होती. कारण त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर शिवाला आपल्या बहिणींच्या लग्नासाठी अनेक कामं करावी लागली. शिवा म्हणाला की, "त्याची स्वप्न ज्यात शिक्षण आणि तारूण्य होतं, ती आता रात्रीची मेहनत आणि बहिणींच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या खाली दबली गेली होती".

 

हिमांशुनं आपल्या पोस्टमध्ये प्रश्न उपस्थित केला की, असे आणखी किती लोक असतील जे शिक्षण आणि स्वप्नं सोडून परिवाराचं पोट भरण्याचं काम करत आहेत. त्यांनी लिहिलं की, "या लोकांसाठी आपण काही करू शकतो का?". इतकंच नाही तर हिमांशुनं झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांना टॅग केलं आणि सल्ला दिला की, झोमॅटोनं त्यांच्या डिलिव्हरी एजंट्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्कॉलरशिप्स किंवा सोपं लोन यांसारख्या योजनांचा विचार केला पाहिजे.

झोमॅटोनं हिमांशुच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि शिवाची कहाणी सगळ्यांसमोर आणण्यासाठी धन्यवादही दिले. झोमॅटोनं लिहिलं की, "हिमांशु, आम्हाला ही माहिती देण्यासाठी धन्यवाद. हे खूप प्रेरणादीय आहे आणि आम्हाला आमच्या डिलिव्हरी एजंट्सवर गर्व आहे". 

Web Title: 8th pass Zomato delivery boy from Delhi struggles for his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.