VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:21 IST2025-11-18T16:20:19+5:302025-11-18T16:21:35+5:30
80 year old man sky diving video viral : त्यांचा हा धाडसी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय

VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग'
80 year old man sky diving video viral : आम्ही हरयाणाचे आहोत, कुणालाही घाबरत नाही... असे हरयाणाचे लोक बोलताना नेहमीच ऐकले आहे. अशाच जोशाने एका ८० वर्षांच्या आजोबांनी चक्क स्कायडायव्हिंग करत साऱ्यांनाच थक्क केले. त्यांचा हा धाडसी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचल्यानंतर बहुतेक लोक घराबाहेर पडणेही टाळतात, कुठलीही शारीरिक जोखीम घेण्याचे टाळतात, पण आजोबांनी केलेल्या या धाडसी कृत्याला सारेच सलाम ठोक आहेत.
एका नातवाने आपल्या आजोबांचे स्कायडायव्हिंगचे स्वप्न पूर्ण केले. आजोबा हा स्टंट करण्याआधी नातवाने त्यांना विचारले, "तुम्हाला वरून हवेत फेकले जाण्याची भीती वाटत नाही का?" त्यावर आजोबा उत्साहाने म्हणाले, "मला भीती वाटत नाही, मी हरयाणाचा आहे, होऊन जाऊदे." आजोबा जेव्हा स्कायडायव्हिंग आधी तयारी करून बसतात तेव्हा आसपासच्या साऱ्यांनाच कौतुक वाटते. अनेक तरूण-तरूणी त्यांच्यासोबत सेल्फीही काढतात. त्यानंतर विमान आकाशात उडते. प्रशिक्षक विमानाचा दरवाजा उघडतो आणि आजोबांना सोबत घेऊन हवेत झेपावतो. हवेत असतानाही आजोबांची ऊर्जा अतुलनीय असते. इतक्या उंचीवरही आजोबा अजिबात घाबरलेले दिसत नाहीत. अतिशय आनंदाने ते स्कायडायव्हिंग करतात. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सारे नेटकरी आजोबांच्या धाडसाला सॅल्युट करताना दिसत आहेत.