बाबो! ८ किलो 'बाहुबली' समोसाची किंमत १,१०० रुपये; दुकानदारानं सांगितलं अनोखं महत्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 18:09 IST2022-10-30T18:09:20+5:302022-10-30T18:09:43+5:30
सोशल मीडियावर सध्या ८ किलोचा 'बाहुबली' समोसा चर्चेचा विषय बनला आहे. या भल्या मोठ्या समोसाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

बाबो! ८ किलो 'बाहुबली' समोसाची किंमत १,१०० रुपये; दुकानदारानं सांगितलं अनोखं महत्व!
मेरठ-
सोशल मीडियावर सध्या ८ किलोचा 'बाहुबली' समोसा चर्चेचा विषय बनला आहे. या भल्या मोठ्या समोसाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. इतका मोठा समोसा पाहून लोकही हा नेमका कुठं बनवण्यात आला आहे याची विचारणा करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार 'बाहुबली' समोसा उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये तयार करण्यात आला आहे. कौशल स्वीट्स नावाचं मिठाईचं दुकान चालवणारे शुभम आणि उज्वल या दोन भावांनी ८ किलोचा समोसा तयार केला आहे. इतकंच नव्हे, तर आता दोघंही १० किलोचा समोसा बनवण्याची तयारी करत आहेत.
मेरठच्या लालकुर्ती परिसरात कौशल स्वीट्स दुकानाचे मालक शुभम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं कुटुंब १९६४ सालापासून मिठाईचं दुकान चालवतात. आता त्यांची तिसरी पिढी दुकान चालवत आहेत. काहीतरी नवं करण्याची इच्छा दोन्ही भावांची असते यातूनच हा ८ किलोचा समोसा साकार झाल्याचं शुभम यांनी यांनी सांगितलं.
कौशल स्वीट्सच्या मालकांनी याआधी ४ किलोचा समोसा तयार केला होता. त्यांच्या या प्रयोगाचं सर्वांनी खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर दोन बंधूंनी ८ किलोच्या समोसा तयार करण्याचं ठरवलं आणि कामाला लागले. जुलै महिन्यात ८ किलोचा समोसा तयार करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. आता दोघही १० किलोचा समोसा तयार करणार आहेत.
११०० रुपये किंमत
दुकानाच्या मालकांनी सांगितलं की ८ किलोचा समोसा तयार करण्यासाठी जवळपास ११०० रुपयांचा खर्च आला आहे. तर १० किलोचा समोसा तयार करण्यासाठी १५०० रुपये खर्च येणार आहे. ८ किलोचा समोसा तयार करण्यासाठी ३ किलो मैदा आणि जवळपास ५ किलोचं बटाटे, वाटाणे, पनीर आणि मिक्स ड्रायफ्रूट जसं की काजू, किशमिशसह इतर स्टफिंग भरावं लागलं आहे.
२ ते ३ तास लागले
८ किलोचा समोसा तयार करण्यासाठी २ ते ३ तास लागले. यासाठी ३ कर्मचारी काम करत होते. कारण हे काही एका व्यक्तीचं काम नक्कीच नाही. ८ किलोचा समोसा तयार करण्यामागची सर्वात मोठी अडचण म्हणजे तो तेलात तळणं ही होती. एवढा मोठा समोसा तेलात तळणं काही सोपी गोष्ट नाही. यासाठी कुशल कामगारांची गरज लागली.