बापाचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ६ वर्षाचा मुलगा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत, त्याची मेहनत पाहून प्रेक्षकही थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:39 IST2026-02-27T10:38:46+5:302026-02-27T10:39:44+5:30
Viral News : स्टेजवर जेव्हा ६ वर्षीय रचित पांचाळ आत्मविश्वासाने पोज देताना दिसला, तर पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

बापाचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ६ वर्षाचा मुलगा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत, त्याची मेहनत पाहून प्रेक्षकही थक्क
Viral News : सध्या सोशल मीडियावर एका ६ वर्षीय बॉडी बिल्डरचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. मुंबईत आयोजित ज्युनिअर मुंबई श्री २०२६ स्पर्धेत त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे ही स्पर्धा यावेळी चांगलीच चर्चा आहे. या मुलाची भावूक करणारी कहाणी लोकांना मनाला भिडत आहे. स्टेजवर जेव्हा ६ वर्षीय पंचित पांचाळ आत्मविश्वासाने पोज देताना दिसला, तर पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
रचितची कहाणी संघर्ष आणि मेहनतीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. २०२४ मध्ये एका अपघातामुळे त्याच्या बॉडीबिल्डर वडिलांचं स्वप्न अधुरं राहिलं. अशात परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण वडिलांचं स्वप्न इथेच संपलं नाही. त्यांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्प करत रचितने कमी वयातच बॉडीबिल्डींगच्या विश्वात पाऊल ठेवलं.
ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशनद्वारे आयोजित या स्पर्धेत ५५ किलो वजन वयोगट आणि २३ वर्षापेक्षा कमी वयोगटात रचितच्या सहभागाने सगळ्यांना अवाक् केलं. त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या स्पर्धकांसमोर त्याने ज्या आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने स्टेजवर सादरीकरण केलं ते बघून सगळेच थक्क झाले.
मुंबई के 6 साल के रचित पांचाल ने जूनियर मुंबई श्री 2026 बॉडीबिल्डिंग प्रतियोगिता में वह कर दिखाया जिसकी कल्पना किसी ने नहीं की थी।
— khulasa India (@KhulasaIndia) February 26, 2026
रचित के पिता उमेश पांचाल, जो खुद एक पदक विजेता बॉडीबिल्डर हैं, 2024 में एक गंभीर सड़क दुर्घटना का शिकार हो गए थे, जिससे उनका पेशेवर करियर और सपना… pic.twitter.com/GxkufGefyG
स्पर्धेदरम्यान रचितने वेगवेगळ्या पोज देऊन आपली तयारी आणि मेहनतीचा परिचय दिला. अर्थात प्रेक्षकांसाठी हा नजारा भावूक करणारा होता. यावेळी त्याच्या आईचे डोळे पाणावले होते. त्या म्हणाल्या की, मुलाचं हे सादरीकरण वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक सुरूवातीचं पाऊल आहे. ही केवळ एक स्पर्धा नाही तर हिंमत, परिवार आणि स्वप्नांची कहाणी आहे. ६ वर्षाचा हा खेळाडू सध्या मुंबई स्पिरिटची ओळख ठरत आहे.