शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

जीममध्ये वर्कआऊट करुन ‘तो’ अक्षरश: खाली कोसळला; अखेरची २ मिनिटं CCTV त कैद, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 16:00 IST

सुरुवातीला या व्हिडीओत त्या व्यक्तीला छातीत वेदना होत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर तो पाणी पितो

बंगळुरु - अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिसणारी व्यक्ती सिद्धार्थ शुक्ला असण्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक माणूस जीममध्ये वर्कआऊट करत असतानाच त्याला मध्येच अस्वस्थ वाटायला लागतं. त्यानंतर तो जीमच्या बाहेर असणाऱ्या पायऱ्यांवर काही मिनिटं बसतो.

सुरुवातीला या व्हिडीओत त्या व्यक्तीला छातीत वेदना होत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर तो पाणी पितो. पुन्हा उभं राहून छातीवर दाब देण्याचा प्रयत्न करत असतो. या व्यक्तीच्या छातीत वेदना होत असल्यानं तो छातीवर दाब देतो तसेच आर्म्स घट्ट पकडतो. हा माणूस सिद्धार्थ शुक्ला असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर काही वेळानंतर तो माणूस उठून पुन्हा जीमला जातो. परत काही सेकंदात परत येतो आणि पायऱ्यांवर बसतो. त्यानंतर त्याच्या वेदना वाढतच जातात आणि तो खाली कोसळतो. या घटनेचा २ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ बंगळुरु येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. यात ३३ वर्षीय एक व्यक्ती जीमबाहेरील पायऱ्यांवरुन खाली कोसळताना दिसतो. जीम वर्कआऊट दरम्यान त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्याने तो पायऱ्यांवर जाऊन बसला. पाणी प्यायल्यानंतर तो काही काळ छातीवर दाब देत होता. या घटनेचं CCTV फुटेज व्हायरल होत आहे. २५ ऑगस्ट २०२१ चा हा व्हिडीओ आहे. त्यामुळे यातील व्यक्ती सिद्धार्थ शुक्ला असल्याचं चुकीची माहिती पसरवली जात आहे.   

फिजिकल फीट असल्याचं बघितलं जातं. त्याला कुठलाही शारिरीक त्रास आहे का? या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. त्याआधारे जीम ट्रेनरकडून वर्कआऊट दिलं जातं. कुठल्याही वर्कआऊटमुळे ह्दयविकाराचा झटका येणं याची शक्यता नाही. परंतु एखादा मानसिक तणावात असेल आणि तो अतिरिक्त वर्कआऊट करत असेल तर असा प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीममध्ये वर्कआऊट करताना शारिरीक क्षमतेपेक्षा अतिरिक्त व्यायाम करू नये असा सल्ला जीम ट्रेनर विराज परुळेकर यांनी दिला आहे.    

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया