बाबो! "मी त्यांच्यासाठी जीवही देईन..."; 53 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली 22 वर्षांची तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 15:52 IST2023-09-19T15:51:55+5:302023-09-19T15:52:29+5:30

22 वर्षांची तरुणी एका 53 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली. तरुणीचं या व्यक्तीवर इतकं प्रेम आहे की ती त्याच्यासाठी आपला जीव देण्यास तयार आहे.

22 year old girl fell in love with 53 year oldman now she is ready to sacrifice her life | बाबो! "मी त्यांच्यासाठी जीवही देईन..."; 53 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली 22 वर्षांची तरुणी

बाबो! "मी त्यांच्यासाठी जीवही देईन..."; 53 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली 22 वर्षांची तरुणी

कोण, कधी, कोणाच्या, कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. माणूस प्रेमात इतका आंधळा असतो की त्याला ना वय दिसतं ना जात, धर्म. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये 22 वर्षांची तरुणी एका 53 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली. तरुणीचं या व्यक्तीवर इतकं प्रेम आहे की ती त्याच्यासाठी आपला जीव देण्यास तयार आहे.

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून लोकांचा या प्रेमावर विश्वास बसत नाही. काही युजर्सचं म्हणणं आहे की त्यांनी ऐकलं होतं की प्रेम आंधळं असतं पण आज ते पहिल्यांदाच पाहत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर आल्यापासून लोक या नात्याबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत. तर काही लोक या व्हिडिओला स्क्रिप्टेड म्हणत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती तरुणीसोबत आहे. पुरुषाने त्याचे वय 53 वर्षे तर मुलीने तिचे वय 22 वर्षे सांगितले आहे. दोघेजण पार्कमध्ये एकत्र फिरत होते. तेवढ्यात एक माणूस त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना त्याच्याजवळ येतो आणि त्याला प्रश्न आणि उत्तरं विचारू लागतो. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या उत्तरात मुलगी काय म्हणते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मुलीने सांगितलं की, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्यासाठी माझा जीवही देईन.

युजर्सच्या मजेदार कमेंट्स 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @butterfly__mahi नावाच्या पेजने शेअर केला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्स या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करत या कपलबद्दल बोलत आहेत. सध्या हे प्रकरण जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 22 year old girl fell in love with 53 year oldman now she is ready to sacrifice her life