'त्या' व्हिडिओनंतर टिकटॉक स्टारचा ६ दिवसांतच मृत्यू; कुटुंबियांसह चाहत्यांना बसला जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 08:54 IST2023-03-30T08:54:04+5:302023-03-30T08:54:32+5:30
‘मी सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करते’, असे ती त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती.

'त्या' व्हिडिओनंतर टिकटॉक स्टारचा ६ दिवसांतच मृत्यू; कुटुंबियांसह चाहत्यांना बसला जबर धक्का
गाडी चालविताना अजूनपर्यंत एकदाही माझा अपघात झाला नाही, असा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही दिवसांतच किशोरवयीन टिकटॉक स्टार कारा सँटोर्ली (वय १८) हिच्या कारचा भीषण अपघात झाला आणि जागीच मृत्यू झाला. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये १७ मार्चला ही घटना घडली.
उलट्या दिशेने आलेली कार तिच्या कारला धडकली, लगेचच एका गाडीला आग लागली आणि दोन्ही चालकांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच, तिने टिकटॉकवर कार अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांवर टीका करणारा व्हिडीओ शेअर केला होता. बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे यांचे अपघात होतात असे ती म्हणाली होती, त्याच्या पुढच्याच आठवड्यात अवघ्या सहा दिवसांनी ही घटना घडली.
‘मी सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करते’, असे ती त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती. अनेकजण माझ्यावर खराब ड्रायव्हर असल्याची टीका करतात; पण मी कधीही एखाद्या व्यक्तीला किंवा गाडीला धडक दिलेली नाही, असे कॅप्शनही व्हिडीओसाठी वापरले होते. तिने तिच्या कारमध्ये बसूनच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तिच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि चाहत्यांनाही जबर धक्का बसलाय. दरम्यान, तो व्हिडीओ व्हायरल होत असून, १५,०००,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया उमटत आहेत.