Video एकटा हत्ती १४ सिंहिणींवर पडला भारी, बघा जंगलातली ही फाईट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 16:55 IST2022-11-24T16:54:40+5:302022-11-24T16:55:19+5:30
जंगलात राहून जंगलाच्याच राजाशी वैर घ्यायचं नसतं. त्याच्या नजरेपासून कोणतीच शिकार वाचू शकत नाही हे आपल्याला माहित आहे. सिंहापासून आपली सुरक्षा व्हावी म्हणुन प्रत्येक प्राणी हा झुंडीत राहतो.

Video एकटा हत्ती १४ सिंहिणींवर पडला भारी, बघा जंगलातली ही फाईट!
video : जंगलात राहून जंगलाच्याच राजाशी वैर घ्यायचं नसतं. त्याच्या नजरेपासून कोणतीच शिकार वाचू शकत नाही हे आपल्याला माहित आहे. सिंहापासून आपली सुरक्षा व्हावी म्हणुन प्रत्येक प्राणी हा झुंडीत राहतो. जेव्हा शिकार एकटी असते तेव्हा त्याचा मृत्यु हा निश्चित असतो. झुंडीत असलेला प्राणी एखाद्या विशालकाय प्राण्यालाही हरवू शकतो. मग तो हत्ती असू दे किंवा जिराफ. सध्या सोशल मीडियावर एक video व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये lioness १४ सिंहीणी एका हत्तीलाही खाली पाडतात. मात्र गजराजची ताकद आणि बुद्धी त्याला शिकार होण्यापासून वाचवते. शेवटी या सिंहीणीही थकतात आणि हार मानतात.
हा व्हिडिओ Instagram इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. युझर्स ने यावर प्रतिक्रिया देत हत्तीच्या ताकदीची प्रशंसा केली आहे. वाह! हत्ती काय लढलाय असं एक युझर म्हणतोय. तर हत्तीच जंगलाचा खरा राजा आहे अशी कमेंट एका युझरने केली आहे. हे दृश्य झिंबाब्वेच्या दक्षिण लुआंगवा नॅशनल पार्क मधला आहे.
जंगलात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करता आले. काहींना वाटले हत्तीचा मृत्यु निश्चित आहे. त्यानंतर झालेली फाईट बघुन पर्यटकांनाही आश्चर्य वाटले.