आई-बाबाला सायकल रिक्षातून गावी घेऊन निघाला ११ वर्षांचा श्रावणबाळ, पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 19:57 IST2020-05-15T19:52:11+5:302020-05-15T19:57:30+5:30
उत्तर प्रदेशातील वाराणसीतील एक ११ वर्षांचा चिमुरडा आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जात आहे.

आई-बाबाला सायकल रिक्षातून गावी घेऊन निघाला ११ वर्षांचा श्रावणबाळ, पाहा व्हायरल व्हिडीओ
कोरोनामुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊनमुळे नोकरीधंद्यासाठी आपलं गाव सोडून शहरात राहायला आलेल्या लोकांचे मात्र हाल झाले. गेल्या काही दिवसात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे मिळेल ते वाहन घेऊन किंवा पायी चालत लोक आपल्या घराच्या वाटेला लागले आहेत. कोरोनाच्या काळात मोठं स्थलांतर होताना दिसून येत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
11 year old kid driving his Parents from Banaras to Araria. 💔pic.twitter.com/J0uCT9l6g3
— Mohammed Zubair (@zoo_bear) May 14, 2020
या व्हिडीयोत उत्तर प्रदेशातील वाराणसीतील एक ११ वर्षांचा चिमुरडा आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जात आहे. हे तीघे बिहारला जाण्यासाठी निघाले आहेत. विशेष म्हणजे हा ११ वर्षांचा मुलगा स्वत: सायकल रिक्षा चालवत आपल्या आई-वडिलांना गावी घेऊन निघाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या चिमुकल्याचे मागे बसलेले वडील थकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. उंची पुरत नसताना सुद्धा हा लहानगा सायकल रिक्षा चालवत आहे. अभिनेत्री रिचा चड्ढानेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. (आता सूर्यही झाला 'लॉकडाऊन'; भीषण थंडी, भूकंपाची वैज्ञानिकांनी व्यक्त केली शक्यता)
सोशल मीडीयावर या मुलाला श्रावणबाळ असं म्हटलं जात आहे. या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुलाला सायकल चालवताना पाहून गाडी थांबवून व्हिडिओ काढणारी व्यक्ती या मुलाची चौकशी करते. त्यावेळी हा मुलगा आपण वाराणसीवरुन आरियाला चालल्याचे सांगतो. त्यानंतर या चिमुरड्याचा व्हिडीओ काढणारी व्यक्ती मदत म्हणून पैसै देताना दिसून येते. (कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ)