कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 07:37 PM2020-05-14T19:37:24+5:302020-05-14T19:37:46+5:30

या ट्यूटोरियल व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डॉक्टरांनी मास्क लावण्याची योग्य पद्धत दाखवली आहे.

Coronavirus lockdown doctor demonstrate how to wear n95 mask viral video myb | कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ

कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत, पाहा व्हायरल व्हिडीओ

Next

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या मास्क, ग्लोव्हज घालणं गरजेंच  झालेलं आहे. तसंच सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळण्यासाठी सुद्धा सर्वच स्तरांतून आवाहन करण्यात येत आहे. कारण आतापर्यंत कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कोणतीही लस किंवा औषधाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या माहामारीला  रोखायचं असेल तर मास्क घालणं गरजेंच आहे.  कारण कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

@toppodiatry

Hope this helps someone. ##masks##correctway##n95mask##n95##coronavirus##covid19##ppe##personalprotectiveequipment

♬ Cradles - Sub Urban
 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत  डॉक्टरांनी मास्क कसा वापरायचा याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे. हा व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 

लोकांना मास्क घालत असताना अनेकदा त्रासाचा सामना करावा लागतो. या ट्यूटोरियल व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डॉक्टरांनी मास्क लावण्याची योग्य पद्धत दाखवली आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ३० लाखांपेक्षा जासत व्हिव्हज आणि ६४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  ३०० पेक्षा जास्त कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून मास्क घालण्यासंबंधी योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं. 

(Video : कोरोनामुळे संपूर्ण कुटुंब निराधार; थकलेल्या लेकराला नेणाऱ्या आई-बापाला बॅगचा आधार)

(बाबो! प्री वेडींग फोटोशुटची असली कसली हौस; नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस)

 

Web Title: Coronavirus lockdown doctor demonstrate how to wear n95 mask viral video myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.