मळगाव येथे अपघातात युवक जखमी, कुटीर रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 15:18 IST2019-10-07T15:16:09+5:302019-10-07T15:18:57+5:30
मळगावहून दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या सचिन सावंत याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो फिट येऊन पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे

मळगाव येथे अपघातात युवक जखमी, कुटीर रुग्णालयात दाखल
ठळक मुद्देमळगाव येथे अपघातात युवक जखमीकुटीर रुग्णालयात दाखल
सावंतवाडी : मळगावहून दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या सचिन सावंत याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो फिट येऊन पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे
मळगावहून सचिन हा आपल्या दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येत होता. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने मळगाव येथील पुलाखाली दुचाकी थांबवित असतानाच तो थेट रस्त्याच्या बाजूला पडला. यात त्याच्या डोक्यासह हात, पाय व नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी त्याला त्वरित कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे.