Sindhudurg: कलमठ येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या

By सुधीर राणे | Updated: May 28, 2024 12:38 IST2024-05-28T12:37:45+5:302024-05-28T12:38:16+5:30

कणकवली : तालुक्यातील कलमठ, लांजेवाडी येथील प्रशांत दयानंद पाष्टे (वय २७) या तरुणाने आपल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. ...

Youth commits suicide by hanging himself in Kalamath Sindhudurg | Sindhudurg: कलमठ येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या

Sindhudurg: कलमठ येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या

कणकवली : तालुक्यातील कलमठ, लांजेवाडी येथील प्रशांत दयानंद पाष्टे (वय २७) या तरुणाने आपल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

प्रशांत हा आपल्या लांजेवाडी येथील दुकानात रोज रात्री झोपत असे. त्याप्रमाणे सोमवारी रात्री प्रशांत दुकानात झोपायला गेला होता. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह दुकानात आढळून आला. दुकानाच्या छप्पराच्या लोखंडी अँगलला त्याने गळफास लावून घेतला होता. प्रशांत याला व्यायामाची आवड होती. शरीर सौष्ठव स्पर्धेतही तो सहभागी होत असे. 

प्रशांतच्या आत्महत्येची माहिती समजताच त्याच्या कुटुंबियांसह कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या घटनेबाबत कळविताच हवालदार मिलिंद देसाई, स्वप्नील कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत याच्या पश्चात आई, वडील, आजी, बहीण, भाऊ असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: Youth commits suicide by hanging himself in Kalamath Sindhudurg