नेतर्डे येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:07 IST2020-04-21T11:06:03+5:302020-04-21T11:07:10+5:30

नेतर्डे-लिंगाचा मळा येथील सुशांत हिरे गवस (३५) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी नदीवर पोहोण्यास गेलेल्या युवकाचा मृतदेह नदीपात्रात रविवारी सकाळी तरंगताना आढळून आला.

Young man drowned in riverbed at Manetarde | नेतर्डे येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

नेतर्डे येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

ठळक मुद्देनेतर्डे येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यूआकस्मिक निधनाने नेतर्डे परिसरात हळहळ

बांदा : नेतर्डे-लिंगाचा मळा येथील सुशांत हिरे गवस (३५) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी नदीवर पोहोण्यास गेलेल्या युवकाचा मृतदेह नदीपात्रात रविवारी सकाळी तरंगताना आढळून आला.

याची बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुशांत गवस शनिवारी सायंकाळी नदीवर आंघोळीसाठी गेला होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा शोधाशोध केली असताना नदीपात्रात सुशांतचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

याची माहिती अशोक नारायण गवस यांनी बांदा पोलिसांना दिली. बांदा पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. सायंकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन केले.

मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. सुशांत हा विवाहित होता. त्याच्या आकस्मिक निधनाने नेतर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Young man drowned in riverbed at Manetarde