शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कार्य कौतुकास्पद : आनंदराव अडसूळ, ओरोस येथे को-आॅपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गच्या एकता मेळाव्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:16 PM

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्याने बँकेला सहकार क्षेत्रात महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. बँकेत आधुनिक प्रणालींचा अवलंब करीत या बँकेने सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली आहे आणि याचे सर्व श्रेय या बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना जात आहे. या बँकेने घेतलेली भरारी पाहता ही बँक सहकार क्षेत्रातील राज्यातील नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची बँक असल्याचे गौरवोद्गार शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी युनियनच्या एकता मेळाव्यात बोलताना काढले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कार्य कौतुकास्पद : आनंदराव अडसूळओरोस येथे को-आॅपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गच्या एकता मेळाव्याचे उद्घाटनअडसूळ यांचा राष्ट्रवादी पक्षातर्फे सत्कार, राजकीय चर्चेला विराम

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्याने बँकेला सहकार क्षेत्रात महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. बँकेत आधुनिक प्रणालींचा अवलंब करीत या बँकेने सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली आहे आणि याचे सर्व श्रेय या बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना जात आहे. या बँकेने घेतलेली भरारी पाहता ही बँक सहकार क्षेत्रातील राज्यातील नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाची बँक असल्याचे गौरवोद्गार शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी युनियनच्या एकता मेळाव्यात बोलताना काढले.को-आॅपरेटीव्ह बँक आॅफ एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांचा एकता मेळावा व वेतन करार स्वाक्षरीचा कार्यक्रम येथील शरद कृषी भवन येथे झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस, प्रज्ञा परब, विकास सावंत, आत्माराम ओटवणेकर, प्रमोद धुरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, को-आॅपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल, मुंबई युनियनचे नरेंद्र सावंत, ठाणे युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रदीप पाटील यांच्यासह जिल्हा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक करताना विष्णू तांडेल म्हणाले की, बँकेच्या हितामध्येच कर्मचाऱ्यांचे हित आहे. बँक जगली तर कर्मचारी जगणार! त्यामुळे जिल्हा बँकेचे कर्मचारी बँकेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्या या कामाबद्दल चांगला मोबदला मिळावा, तसेच बोनस मिळावा यासाठी दर तीन वर्षांनी जिल्हा बँक आणि एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतन करार होत असतो. आणि तो आज होत आहे.को-आॅपरेटीव्ह बँक आॅफ एम्प्लॉईज युनियन आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या एकता मेळाव्यात बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन करारावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या. तसेच या करारांचे आदान-प्रदान यावेळी करण्यात आले.यावेळी  खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अग्रगण्य बँकांच्या बरोबरीने काम करीत आहे. महाराष्ट्रात सहकार जोमाने वाढत आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण ही सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे. ज्याची पत नाही त्याची पत निर्माण करण्याचे काम या जिल्हा बँकेने केले आहे.या बँकेला मिळालेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार, बँको पुरस्कार हेच या बँकेच्या खऱ्या कार्यपद्धतीची ओळख आहेत. यातूनच या बँकेने केलेले काम व तिची प्रगती दिसून येत आहे. जिल्हा बँकेच्या कारभारात कोठेही अनियमितता आढळली आली नाही. त्यामुळेच राज्यातील ३३ जिल्हा बँकांमधून केवळ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोटाबंदी कालावधीतील सुमारे १० कोटी रुपये बदलून मिळाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी सतीश सावंत म्हणाले , आज जी जिल्हा बँकेची आकाशभरारी आहे ती या बँकेच्या कर्मचाऱ्यांच्याच जोरावर आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी एखादी गोष्ट मागितली तर ती त्यांना देण्यास आम्ही कधीच टाळाटाळ करीत नाही.मात्र कर्मचाऱ्यांनी आपले हित सांभाळत असताना खातेदारांच्या ठेवींबाबत गोपनीयता बाळगणे आवश्यक आहे. अशा सूचना करतानाच सुलभ सेवा आणि ग्राहकांचे समाधान हे ध्येय समोर ठेवून जिल्हा बँक देशात नावारूपास येईल असे काम करा, असे प्रतिपादनही सतीश सावंत यांनी केले.

अडसूळ यांचा राष्ट्रवादी पक्षातर्फे सत्कार, राजकीय चर्चेला विरामको-आॅपरेटीव्ह बँक आॅफ एम्प्लॉईज युनियन आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांचा एकता मेळावा व वेतन करार स्वाक्षरीच्या कार्यक्रमाच्या वेळी को- आॅपरेटीव्ह बँक आॅफ एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी पक्षाच्यावतीने पुष्पहार व शाल देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांचे लक्ष या सत्काराकडे होते. मात्र हा सत्कार केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने असल्याचे सांगत डान्टस यांनी निर्माण होणाऱ्या राजकीय चर्चेला विराम दिला. 

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळsindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस