सावडाव येथे महिलेला बांबूच्या सहाय्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:30 PM2020-02-22T12:30:48+5:302020-02-22T12:35:07+5:30

सावडाव येथे महिलेला मारहाण लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : सावडाव गावठणवाडी येथील भक्ती रामचंद्र नरसाळे (३६) या महिलेला संशयित आरोपी आनंद वासुदेव नरसाळे (५६) व स्नेहलता आनंद नरसाळे या दोघांनी नखाने ओरबाडे काढत एका बांबूच्या सहाय्याने मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी भक्ती नरसाळे यांच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी त्या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. भक्ती नरसाळे यांच्या येण्या-जाण्याच्या वाटेवरील जमिनीत लाकडे टाकल्यामुळे त्यांची आनंद नरसाळे व स्नेहलता नरसाळे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले आहे. आनंद नरसाळे व स्नेहलता नरसाळे यांनी हाताच्या नखाने ओरबाडून एका बांबूच्या साहाय्याने मारहाण केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण करीत आहेत.

A woman was beaten with infertility at Sawadav | सावडाव येथे महिलेला बांबूच्या सहाय्याने मारहाण

सावडाव येथे महिलेला बांबूच्या सहाय्याने मारहाण

Next
ठळक मुद्देसावडाव येथे महिलेला बांबूच्या सहाय्याने मारहाणयेण्या-जाण्याच्या वाटेवरील जमिनीत लाकडे टाकल्यामुळे बाचाबाची

कणकवली : सावडाव गावठणवाडी येथील भक्ती रामचंद्र नरसाळे (३६) या महिलेला संशयित आरोपी आनंद वासुदेव नरसाळे (५६) व स्नेहलता आनंद नरसाळे या दोघांनी नखाने ओरबाडे काढत एका बांबूच्या सहाय्याने मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी भक्ती नरसाळे यांच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी त्या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. भक्ती नरसाळे यांच्या येण्या-जाण्याच्या वाटेवरील जमिनीत लाकडे टाकल्यामुळे त्यांची आनंद नरसाळे व स्नेहलता नरसाळे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले आहे.

आनंद नरसाळे व स्नेहलता नरसाळे यांनी हाताच्या नखाने ओरबाडून एका बांबूच्या साहाय्याने मारहाण केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण करीत आहेत.

Web Title: A woman was beaten with infertility at Sawadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.