शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कारची मोपेडला धडक; महिला ठार, दोन चिमुकल्यांसह दिव्यांग पती बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:42 IST

मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील घटना

ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला कारने जोरदार धडक दिल्याने देवगड फणसगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या रा. ओरोस वर्दे रोडवर राहणाऱ्या मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार (वय २७) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मोपेड चालक शशांक प्रकाश पवार (वय ४०), त्यांचे चार महिन्यांचे बाळ पवित्रा व साडेतीन वर्षांचा प्रभास हे सुदैवाने बचावले. हा अपघात सोमवारी (दि.४) झाला.घटनास्थळी त्वरित ओरोस पोलिस, महामार्ग पोलिस आणि कसालचे सरपंच राजन परब पोहोचले. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी कार (एमपी ०९ - झेडवाय ६९७५)ने कणकवलीकडे जाणाऱ्या शशांक पवार यांच्या (एमएच ०७ - एव्ही १२२९) दिव्यांगासाठीच्या चारचाकी मोपेडला महामार्गावर विरोधी दिशेच्या दुसऱ्या लेनवर जाण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत मोपेडवर मागे बसलेली शमिका पवार रस्त्यावर जोराने आदळली. त्यांना मेंदूमध्ये गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मोपेडस्वार शशांक पवार आणि त्यांच्या हातात असलेली चार महिन्यांची पवित्रा व मध्ये बसलेला साडेतीन वर्षांचा मुलगा प्रभास सुदैवाने वाचले.या प्रकरणी कार चालक राहुल शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश गवस, पोलिस कर्मचारी नंदू गोसावी, रवी इंगळे, सागर परब तसेच ओरोस पोलिस ठाण्याचे हवालदार भुतेलो व गोसावी यांची टीम घटनास्थळी उपस्थित होती. नागरिकांनीदेखील मदतकार्य केले.

  • मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल येथील दुर्घटनेत मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार यांचा जागेवरच मृत्यू झाला.
  • मोपेड चालक शशांक पवार, त्यांचे चार महिन्याचे बाळ पवित्रा आणि तीन वर्षांचा मुलगा प्रभास हे गंभीर अपघातातून बचावले.