चौकुळ येथे वीज पडून महिलेचा मृत्यू, सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:17 IST2024-10-15T12:16:59+5:302024-10-15T12:17:21+5:30
सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या परतीच्या पावसाने आंबोली नजीकच्या चौकुळ भागाला चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी ...

चौकुळ येथे वीज पडून महिलेचा मृत्यू, सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम
सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या परतीच्या पावसाने आंबोली नजीकच्या चौकुळ भागाला चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी सायंकाळी पावसाबरोबर ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट झाला. यात शेतातून घरी परतणाऱ्या चौकुळ बेरडकी चिखलव्हाळ येथील द्रौपदी मारुती नाईक (४०) या महिलेच्या अंगावर वीज पडून ती जागीच मृत पावली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चौकुळ येथील द्रौपदी नाईक या घराजवळच असलेल्या शेतात दुपारच्या सुमारास गेल्या होत्या. त्या शेतात काम करत असताना वादळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्या घरी परत येत असताना विजेचा लोळ त्याच्या अंगावर कोसळला आणि त्यात त्या जागीच मृत्यू पावल्या.
चार म्हशींचा मृत्यू
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून घटनास्थळावर धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच चौकुळ येथे वीज पडून चार म्हशी मृत पावल्या होत्या. त्यानंतर ही घटना घडली आहे.