शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वीज तार अंगावर पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:48 AM

विद्युतभारित तार अंगावर पडून गितांजली गुरुदास चोर्लेकर (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विर्डी येथे प्रजासत्ताकदिनी सकाळीच घडली. काजू बागेतील लाकडे घेऊन घरी परतत असताना काळाने गितांजली यांच्यावर वाटेतच घाला घातला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवीज तार अंगावर पडून महिलेचा मृत्यूविर्डी येथे प्रजासत्ताकदिनी घडली घटना

दोडामार्ग : विद्युतभारित तार अंगावर पडून गितांजली गुरुदास चोर्लेकर (४४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विर्डी येथे प्रजासत्ताकदिनी सकाळीच घडली. काजू बागेतील लाकडे घेऊन घरी परतत असताना काळाने गितांजली यांच्यावर वाटेतच घाला घातला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.गितांजली चोर्लेकर रविवारी सकाळी गावालगत असलेल्या गणेशकोंड भागातील जंगलात काजू बागायतीत गेल्या होत्या. तेथून जळाऊ लाकडे घेऊन त्या घरी परतत होत्या. मात्र, डोक्यावरील मोळीचा भार जड झाल्याने त्या वाटेत थांबल्या.

काहीवेळ विश्रांतीसाठी त्या एका जागी बसल्या होत्या. यावेळी अचानक तेथील वीज खांबावरील विद्युतभारित तार तुटून त्यांच्या अंगावर कोसळली. त्याचक्षणी त्यांच्या शरीराला आग लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूला वाळलेले गवत असल्याने परिसरही खाक झाला.याबाबतची माहिती उमेश साटेलकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. गितांजली यांच्या पश्चात पती गुरुदास चोर्लेकर आहेत. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग