भाजपची युवा फळी मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरा करणार - विशाल परब
By अनंत खं.जाधव | Updated: October 23, 2023 17:06 IST2023-10-23T17:05:15+5:302023-10-23T17:06:11+5:30
सावंतवाडी : पक्षाच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार असून युवा मोर्च्याच्या माध्यमातून भाजपाची युवा फळी मजबूत करणार आहे. त्यासाठी ...

भाजपची युवा फळी मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरा करणार - विशाल परब
सावंतवाडी : पक्षाच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार असून युवा मोर्च्याच्या माध्यमातून भाजपाची युवा फळी मजबूत करणार आहे. त्यासाठी आगामी काळात राज्यभर दौरा करणार असल्याचे भाजपा युवा मोर्च्याचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आपणास केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश राणे यांच्यामुळे हे पद मिळाले आहे. येणाऱ्या काळात येथील युवकांना सक्षम करण्यासाठी माझा वाटा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परब यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सावंतवाडीत त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, जीतू गावकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
परब म्हणाले, या ठिकाणी माझे काम पाहून पक्षाच्या नेतृत्वाने मला राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात युवा संघटना मजबूत करण्याबरोबर युवकांच्या हाताला काम कसे मिळेल, यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू राहणार आहे. आता राज्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात राज्यभर दौरे करुन त्या ठिकाणी संघटना मजबूत होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा युवा मोर्च्याचे अध्यक्ष राहुल लोणीकर यांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तसेच केवळ राणे कुटुंब सोबत असल्यामुळेच मला हे पद मिळू शकले आणि मिळालेल्या पदाचा योग्य पध्दतीने आपण वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच भविष्यात युवापिढी सक्षम झाली पाहिजे यासाठी आपले प्रयत्न राहणार असून त्याच्या कल्याणासाठी नवनवीन रोजगार आणणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष गोंदावळे यांनी त्यांना लाडू भरवून अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.