शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गचा विकास सुसाट व्हावा, अधिकाऱ्यांनी आडकाठी आणू नये; नितेश राणे यांचा कडक इशारा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 11, 2026 14:11 IST

​दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर

सिंधुदुर्ग: "जिल्ह्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवून विकासाची जबाबदारी दिली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी ज्या गतीने धावतोय, त्या गतीने प्रशासकीय अधिकारी धावताना दिसत नाहीत. निधी अखर्चित राहणे ही गंभीर बाब असून, जिल्ह्याच्या विकासात आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही," अशा कडक शब्दांत आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला सुनावले.​जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे 'व्हिजन' मांडले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार आणि आता आमदार निलेश राणे यांच्या अनुभवाचा फायदा घेत जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर प्रथम क्रमांकावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

​दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भरनितेश राणे म्हणाले की, जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न साडेचार लाखांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दावोस येथे झालेल्या ४,५०० कोटींच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारामुळे (MoU) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. जिल्ह्यात पहिले 'फाईव्ह स्टार' हॉटेल उभे राहत असून, यामुळे पर्यटनाला नवी झळाळी मिळेल.​पायाभूत सुविधांचा विस्तारचिपी विमानतळासह जलवाहतुकीवर त्यांनी विशेष भर दिला. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग जलवाहतूक आणि रो-रो सेवेमुळे दळणवळण सोपे होणार आहे. विकासासाठी ६०० कोटींचा आराखडा अपुरा असून, तो १००० कोटींपर्यंत नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

'ड्रग्ज'मुक्त सिंधुदुर्गाचा संकल्प​विकासासोबतच जिल्ह्याची तरुण पिढी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ड्रग्ज आणि अमली पदार्थांचा शिरकाव कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. गोव्यातील दारू आणि वाढते व्यसन यावर कडक निर्बंध आणून तरुणाईला योग्य दिशा देण्याचे आवाहन राणे यांनी यावेळी केले.प्रशासनाला 'डेडलाईन'

  • ​निधी अखर्चित का? याचा जाब अधिकाऱ्यांनी द्यावा.
  • ​पारदर्शक प्रशासन: कामात चालढकल नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी.
  • ​समन्वय: लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी 'एक कुटुंब' म्हणून काम करावे.
  • ​पुढील ३ वर्षे: निवडणुका संपल्या असून आता केवळ विकासाची वाटचाल व्हावी.
English
हिंदी सारांश
Web Title : Nitesh Rane Warns Officials: Accelerate Sindhudurg Development, Avoid Obstacles.

Web Summary : Nitesh Rane urged officials to expedite Sindhudurg's development, emphasizing infrastructure, tourism, and job creation. He stressed collaborative governance, drug prevention, and maximizing per capita income, setting a deadline for efficient project execution and accountability, aiming for top ranking for the district.