शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वन्यप्राणी कॉरिडॉरचा होणार अभ्यास, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटचे नाव निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 4:28 PM

वन्य प्राण्यांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांचा मार्ग निश्चित करण्याच्या कामाला गती आली आहे. हा वन्य प्राणी कॉरिडॉर सिंधुदुर्गातील तिलारीपासून दोडामार्ग, तळकट, केसरी, फणसवडे, सोनवडे, घोडगे असे करीत कडावलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्याला जोडला जाणार आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी कॉरिडॉरचा होणार अभ्यास, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटचे नाव निश्चित सिंधुदुर्गातील तिलारीपासून कोल्हापूरच्या राधानगरीपर्यंत सीमांची होणार चाचपणी

अनंत जाधव सावंतवाडी : वन्य प्राण्यांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांचा मार्ग निश्चित करण्याच्या कामाला गती आली आहे. हा वन्य प्राणी कॉरिडॉर सिंधुदुर्गातील तिलारीपासून दोडामार्ग, तळकट, केसरी, फणसवडे, सोनवडे, घोडगे असे करीत कडावलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्याला जोडला जाणार आहे.मात्र, या मार्गाची निश्चिती अद्याप झाली नसून, कॉरिडॉरच्या जागेच्या निश्चितीबरोबरच सीमा निश्चितीचे काम राज्य सरकारने वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेला दिले आहे. या अभ्यासासाठी ८४ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५८ लाख रुपये देण्यात आले आहेत. या कामाची प्रत्यक्ष सुरुवात या मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात वाईल्डलाईफ संस्थेचे सदस्य करणार आहेत.२०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा कॉरिडॉर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य शासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.यात जिल्ह्यातील तिलारीपासून दोडामार्ग, तळकट त्यानंतर केसरी, फणसवडे, घोडगे, सोनवडे, कडावल व त्यानंतर हा मार्ग कोल्हापुरातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याला जोडला जाणार आहे.

दोडामार्ग तिलारीला दांडेली अभयारण्याचा काही भाग लागत असल्याने तो कर्नाटकला जोडला जाणार आहे. यात भीमगड अभयारण्याशी जोडला जाईल. या कॉरिडॉरला सध्या खाण प्रकल्पांमुळे धोका निर्माण झाला आहे. राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक नितीन काकोडकर यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी ८४ लाख रुपये मंजूर केले असून लवकरच हा अभ्यास सुरू होईल.वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट या भागातील हत्ती व वाघांच्या हालचालीसाठी संभाव्य कॉरिडॉर निश्चित करणार आहे. संस्थेचे वैज्ञानिक बिलाल हबीब म्हणाले की, हा प्रकल्प मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. आम्ही दोन शास्त्रज्ञ नियुक्त करू. ते कॉरिडॉरचा नकाशा तयार करतील आणि या दोन तालुक्यातील गावे कॉरिडॉरमध्ये येत आहेत की नाहीत आणि ते इको सेन्सिटिव्ह झोनचा भाग म्हणून घोषित करण्याची गरज आहे का ते तपासतील. आम्ही या कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या मानवी अडचणींचेही मूल्यांकन करणार आहोत, असे ते म्हणाले.न्यायालयाने ५ डिसेंबर रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार वन विभाग, शासनाने पूर्तता केली आहे. इको सेन्सिटिव्ह, जैवविविधता, पशुपक्षी अशा विविध क्षेत्राचा अभ्यास होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे खाण प्रकल्प, रेड झोनमधील प्रकल्प या अहवालानुसार स्पष्ट होतील. खाण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय यामुळे पुढील काळात सरकार निश्चितच घेईल किंवा नाही हे ठरणार आहे. खाण प्रकल्प मालक मात्र सक्रिय होतील, अशी चर्चा आहे.शासनाकडून अभ्यासासाठी ८४ लाख रुपये मंजूर : चव्हाणवन्य प्राण्यांचा कॉरिडॉर हा प्रामुख्याने सिंधुदुर्गमधून जाणार असून त्यासाठी सीमा निश्चिती करण्यात येणार आहे. हे काम वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेला देण्यात आले असून दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्षेत्राचाही संस्था अभ्यास करणार आहे. त्यासाठी ८४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ५८ लाख रुपये मार्च महिन्यात जमा झाले आहेत, असे सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्ग