शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला संपविले, पती फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:24 IST

मृतदेहाच्या बाजूला होती चिठ्ठी

कुडाळ : पत्नीला चारित्र्यावरून संशय घेत ओमप्रकाश बंधन सिंह (५२) याने त्याची पत्नी रेणुका सिंह (४२) हिला ठार मारुन तो फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी कुडाळपोलिसांनी पथक रवाना केले असून मुंबई रेल्वे पोलिसांची मदत घेतली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.नेरूर कविलगाव येथे ओमप्रकाश सिंह हे त्यांची पत्नी रेणुका सिंह, तीन मुली व एक मुलगा असे कुटुंबासह राहतात. ओमप्रकाश सिंह हा सेंट्रिंगची कामे घेतो. मार्च २०२४ मध्ये त्याला भडगाव येथील सेंट्रिंगचे काम मिळाले. त्यामुळे काही दिवस कविलगाव आणि काही दिवस भडगाव येथे पती-पत्नी राहत होते.दरम्यान, या घटनेबाबत त्यांची मुलगी रिया ओमप्रकाश सिंह हिने कुडाळ पोलिसांना माहिती दिली. आई व वडील यांच्यामध्ये सातत्याने भांडण होत होती. वडील आईवर चारित्र्यावरून संशय घेत होते. आणि ही भांडण होत असताना हिला कधीतरी मी ठार मारून कोठडीत जाईन, असे बोलत असत.१३ ऑक्टोबर रोजी वडील ओमप्रकाश यांनी आई रेणुका हिला भडगाव येथे बोलवले. त्याच दिवशी संध्याकाळी रिया तिचे बोलणे आईसोबत झाले होते. १४ ऑक्टोबर रोजी रिया हिने आईला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र हा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. अखेर रियाने १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आपल्या मैत्रिणी सोबत भडगाव धनगरवाडी येथे आई राहत असलेल्या घरी गेली. त्या ठिकाणी घराला कुलूप दिसले म्हणून ती व मैत्रीण पुन्हा कुडाळ येथे आले.

दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी रिया हिचे वडील ओमप्रकाश याने पहाटे ४:४८ वाजता भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आपल्या पत्नीला ठार मारल्याचे सांगितले. आणि चावी चुलीमध्ये आहे. ती घेऊन दरवाजा उघडा तिचे साहित्य बाजूलाच आहे, असे सांगितले. त्यानंतर रिया हिने आपल्या नातेवाइकांना दूरध्वनी वरून पोलिस ठाण्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर रेणुका उर्फ रेश्मा या मृतावस्थेत आढळून आल्या. आपल्या पत्नीला ठार मारून ओमप्रकाश सिंह याने पळ काढला होता.

मृतदेहाच्या बाजूला होती चिठ्ठी

ओमप्रकाश सिंह याने मृतदेहाच्या बाजूला लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे की, पत्नीने मला धोका दिलेला सहन झाला नाही तिला अनेकवेळा परपुरुषाबरोबर फिरताना मी पाहिले. तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मला सोडण्याचा विचार करत होती आणि हे मला मान्य नव्हते म्हणून मी तिला ठार मारले. ही चिठ्ठी ओमप्रकाश सिंह यांच्या हस्ताक्षरात असल्याचे तिची मुली रिया सिंह हिने सांगितले.पथक मुंबईला रवानाओमप्रकाशने आपल्या पत्नीला ठार मारून पळ काढला असून पोलिसांनी मोबाइल लोकेशनद्वारे माहिती घेतली असता ओमप्रकाश हा मुंबई दादर येथे असल्याचे समजून आले. कुडाळ पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक कऱ्हाडकर, पोलिस कर्मचारी माळगावकर, मुंडे या पथकाला मुंबई येथे रवाना केले असून रेल्वे पोलिसांची मदत घेतली आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल असे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.

वीस वर्षापासून हे कुटुंब सिंधुदुर्गातओमप्रकाश सिंह झारखंड येथील मूळ रहिवासी आहे. तर त्याची पत्नी रेणुका ही मूळची कर्नाटक राज्यातील. त्यांनी विवाह केला. त्यानंतर हे कुटुंबीय कुडाळ येथे राहण्यास होते. गेली वीस वर्ष हे कुटुंब या ठिकाणी राहत आहे. ओमप्रकाश हा सेंट्रिंगची काम करत असे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मगदूम यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस