शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
2
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
3
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठे आर्थिक विधेयक संसदेत होणार सादर
4
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
5
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
6
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
7
भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
8
"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
9
New Rules 1 December 2025: आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
10
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
11
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
12
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
13
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
14
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
15
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
16
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
17
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
18
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
19
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
20
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
Daily Top 2Weekly Top 5

धूमस्वारांच्या वेगाची ‘नशा’ रोखणार कोण?

By admin | Updated: October 29, 2015 00:10 IST

पोलिसांकडून कारवाई आवश्यक : पालकांचे दुर्लक्ष; वाहतूक नियमांबाबत जनजागृती होणे गरजेचे

सिद्धेश आचरेकर --- मालवण -आजकाल तरुणाईला वाहनांचे आकर्षण असल्याने महाविद्यालयीन धूमस्वारांची संख्या वाढत आहे. ‘चंगळवादा’च्या विळख्यात सापडलेले हे तरुण बाईक्सचा रस्त्यांवर बेदरकारपणे वापर करून लाखमोलाचे जीव काही तासांत संपवत आहेत. त्यामुळे धूमस्वारांच्या वेगाच्या नशेला आवर घालणार तरी कोण? वाहतूक पोलीस कारवाई करतात खरे, पण पुन्हा हे धूमस्वार ‘पालथ्या घड्यावर पाणी’ या उक्तीप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. परिणामी, काहींना जीव गमवावा लागलाय, तर काहींनी कायमचे अपंगत्व स्वीकारले आहे. तरुणाईच्या बाईक्सच्या वेगाच्या व्यसनाला वाहतूक पोलीसच आळा घालू शकतात. पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना त्यांच्या चुकीची अद्दल घडविली पाहिजे. आज विशेषत: तरुण चंगळवादात भरकटत चालला आहे. पालकांचे दुर्लक्ष होत आहे. मुलांच्या मागणीनुसार पालक त्यांना महागडे मोबाईल, महागड्या गाड्या घेऊन देतात. यात पालकांचा दोष आहे. दररोज एक-दोन अपघात घडत असतात. यात १८ ते ३५ याच वयोगटाची संख्या जास्त असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. आजतागायत तरुणांनी गंभीर अपघाताला स्वत:हूनच आमंत्रण देऊन लाखमोलाच्या जिवाची राखरांगोळी करून घेतली आहे. त्यामुळे आता समाजातील सुज्ञ नागरिकांनी धूमस्वारांविरोधी आवाज उठविला पाहिजे. पालकांनीही याकडे कानाडोळा न करता विशेष लक्ष घालून पाल्याच्या धूमस्टाईलची नशा उतरविण्याचा प्रयत्न करणे आजमितीस गरजेचे बनले आहे. पोलिसांनी कडक धोरण अवलंबवावेधूमस्वारांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. वाहतूक पोलीस कायद्यातील तरतुदीप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र, बऱ्याचदा असे होते की, पोलिसांनी दुचाकी तसेच अन्य वाहनांना कारवाईसाठी थांबविल्यावर तो चालक कोणा एका राजकीय पुढाऱ्याला फोन करतो. ट्रॅफिक पोलीस त्याच्याबरोबर संवाद साधतो आणि त्याला सोडून देतो. हे मुळात चुकीचे आहे. वाहतुकीच्या बाबतीत पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचे धोरण अवलंबले पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांना न जुमानता कायद्याप्रमाणे कारवाई केल्यास नक्कीच धूमस्वारांना आळा बसू शकेल. पालकांनी जागरूक व्हावेधावपळीच्या युगात पालक आणि पाल्यात समन्वयाचा अभाव दिसून येतो. पालक नोकरी, व्यवसायात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्यास तितकासा वेळ मिळत नाही. त्यात पाल्याच्या हरएक मागण्या- इच्छा पालक पुरवून मोकळे होतात. मात्र, त्याचे गंभीर परिणाम होणार याची कल्पना असतानाही याकडे दुर्लक्ष करून महागड्या गाड्या, बाइक्स पुरवतात. काही पालक पाल्यांना आॅफर देतात. दहावी उत्तीर्ण झाल्यावर तुला अमुक घेऊन देईन म्हटल्यावर मग त्याची वचनपूर्ती पालकांकडून होते. विद्यार्थी दहावीपासून दुचाकीवर आरूढ होतात. त्यामुळे पालकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन पाल्यांना शिस्तीचे धडे द्यावेत.रस्त्यांची अवस्था अन् बाईक्स क्षमता सध्या मालवण शहराचा विचार केला तर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थी अगदी बेदरकारपणे दुचाकी हाकत आहेत. शहरात ‘फास्ट’ ट्रॅक प्रकारातील जवळपास २० हून अधिक बाईक्स असतील. या बाईक्सची क्षमता ताशी १५० कि.मी. असते. मात्र, शहरातील रस्त्यांवर या बाईक्स १०० च्या वेगाने पळवून काय फायदा आहे? धूमस्वारांच्या वेगाच्या नशेचा काहीवेळा पादचाऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे हायस्पीड वाहने हाकणाऱ्यांना आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होता नये याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे. नेहमी घडणाऱ्या अपघातांचा तरुणाईने बोध घेतल्यास अपघातांचे प्रमाणही कमी होईल, यात शंकाच नाही.