शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका आल्या की ईडी, सीबीआयच्या नावाने भाजपची बदनामी; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

By अनंत खं.जाधव | Updated: December 16, 2023 17:10 IST

भारत जोडो यात्रे वरून काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रेवर आली

सावंतवाडी : भाजप सरकारने मागील नऊ वर्षात अनेक विकासाचे प्रकल्प देशात उभारले आहेत. मात्र विरोधकांना चांगलं काही दिसत नाही निवडणुका आल्या की फक्त ईडी आणि सीबीआय च्या माध्यमातून विरोधी पक्षांना त्रास देतात अशा प्रकारची भाजपची बदनामी सुरू केली जाते. पण याला जनता बळी पडणार नाही. हे तीन राज्यातील विजयानंतर दिसून आले असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आज, शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत जोडो यात्रे वरून काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रेवर आली असल्याची टीका ही त्यांनी केली. यावेळी माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री मिश्रा म्हणाले, मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाची संकल्पना सर्व सामान्य जनते पर्यत पोचवली. त्यामुळेच देशात मोदींबद्दल सर्वसामान्य जनतेत गॅरंटी निर्माण झाली असून मोदी हेच गॅरंटीचे दुसरे नाव असल्याचे तीन राज्यानी दाखवून दिले. तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असेही मिश्रा यांनी सांगितले. काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रा काढत आहे मात्र उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस फक्त पन्नास मतदार संघापुरती राहिली असल्याचे मंत्री मिश्रा म्हणाले.

ईडीकडून आजपर्यंत १ लाख ३६ हजार कोटींची बेनामी संपत्ती जप्त ईडी, सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा आहेत. आज पर्यत ईडीच्या माध्यमातून १ लाख ३६ हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पण विरोधकांना हे दिसत नाही. ईडी, सीबीआयचा वापर भाजप करत असल्याचा आरोप करून भाजपची बदनामी सुरू आहे. पण देशातील जनतेला सर्व काही माहीत असून जनता सुज्ञ असल्याचे मंत्री मिश्रा म्हणाले.

दोषींवर कारवाई होणारचउपमुख्यमंत्री अजित पवार,  भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची चौकशी होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर मात्र मंत्री मिश्रा यांनी त्रोटक उत्तरे दिली. ईडी सीबीआयच्या चौकशीत जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होईलच असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग