नारायण राणे यांचे स्वागतच ! चंद्रकांत पाटील : पक्षासाठी बांधकाम खाते सोडेन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:45 IST2017-08-21T04:44:18+5:302017-08-21T04:45:06+5:30

एका कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय राज्यात होऊ शकत नाही, तो दिल्लीतच होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचे भाजपामध्ये स्वागतच आहे. मात्र, प्रवेशाची कोणतीही डेडलाईन नसल्याचे राज्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडी येथे सांगितले.

 Welcome to Narayan Rane! Chandrakant Patil: The party will leave the construction work for the party | नारायण राणे यांचे स्वागतच ! चंद्रकांत पाटील : पक्षासाठी बांधकाम खाते सोडेन  

नारायण राणे यांचे स्वागतच ! चंद्रकांत पाटील : पक्षासाठी बांधकाम खाते सोडेन  

सावंतवाडी (जि.सिंधुदर्ग) : एका कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय राज्यात होऊ शकत नाही, तो दिल्लीतच होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचे भाजपामध्ये स्वागतच आहे. मात्र, प्रवेशाची कोणतीही डेडलाईन नसल्याचे राज्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडी येथे सांगितले. पक्षासाठी बांधकाम खातेही सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते खारेपाटणपर्यंतच्या महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, नारायण राणे भाजपमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांनी पक्षप्रवेशाबाबत भाजपासमोर कोणत्याही अटी ठेवल्या नाहीत. तसेच मी माझे सार्वजनिक बांधकाममंत्रीपद हे पक्षासाठी केव्हाही सोडून देईन. मला पदाची कोणतीही लालसा नाही, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title:  Welcome to Narayan Rane! Chandrakant Patil: The party will leave the construction work for the party