सिंधुुदुर्ग : कणकवलीत आदित्य ठाकरे यांचे स्वागत, महिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:21 IST2018-10-26T13:18:45+5:302018-10-26T13:21:07+5:30
रत्नागिरी दौऱ्यावर आलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हयात आगमन झाले. कणकवली येथील विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कणकवली विजय भवन येथे शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले . यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सोबत अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कणकवली : रत्नागिरी दौऱ्यावर आलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हयात आगमन झाले. कणकवली येथील विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही पुष्पगुच्छ देऊन आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
यावेळी विधानसभा संघटक सचिन सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाध्यक्ष अॅड.हर्षद गावडे , मंदार शिरसाट,जिल्हा परिषद सदस्य तथा मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी सावंत, नीलम सावंत-पालव, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब,मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,नगरसेवक सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख राजू राठोड, ओसारगाव सरपंच प्रमोद कावले, रुपेश आमडोसकर,प्रथमेश परब, महेश देसाई, सागर वाळके यांच्यासह जिल्हाभरातील शिवसैनिक उपस्थित होते.