शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"मशाल चिन्ह दिसलं की निधी कमी करून टाकतो", मंत्री नितेश राणे यांचे ठाकरेंना डिवचणारे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:38 IST

Nitesh Rane Uddhav Thackeray: कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होईल असे विधान केले आहे. ठाकरेंना डिवचताना आपण उद्धवसेनेच्या सरपंचांचा निधी कमी करतो, असे म्हटले आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच प्रचारादरम्यान कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एक विधान केले. "कमळ किंवा धनुष्यबाण चिन्ह दिसले की, लगेच निधी देतो. पण, चुकून मशाल चिन्ह निघाले की, असलेला निधीही कमी करून टाकतो", असे नितेश राणे म्हणाले आहेत. कणकवलीमधील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार करताना त्यांनी हे विधान केले. 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत बोलताना नितेश राणे म्हणाले, "चिन्ह बघून निधी देतो. कमळ आणि धनुष्यबाण आमची चिन्हे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतही सगळ्या सरपंचांना सांगितले होते की, आम्हाला ग्रामपंचायत द्या, नाहीतर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्यामुळे सगळे सरपंच पटापट आमचे झाले."

"लोकांनाच प्रश्न पडलाय, विरोधकांना मतदान करायचं का?"

नितेश राणे म्हणाले, "विरोधी उमेदवारांना मतदान का करायचं? असा प्रश्न लोकांना पडला आहे. ही निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. गेली २७ वर्षे जिल्हा परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि पुढील पाच वर्षेही राहील. जिल्ह्याचा विकास खासदार नारायण राणे आणि महायुतीच करू शकते", असा दावा नितेश राणे यांनी केला.   "उबाठाची आम्हाला कोणतीही चिंता नाही. जे काही उमेदवार उरले आहेत, ते प्रचार करताना दिसत नाहीत. काही तर लपत फिरत आहेत. निवडणुकीनंतर पुन्हा निधीसाठी आमच्याकडेच यावे लागणार आहे", नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

"फोंडा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही. मला या मतदारसंघात नंबर वन लीड द्या. पहिला एक कोटी रुपयांचा निधी देतो", अशी घोषणा नितेश राणेंनी आचारसंहिता लागलेली असताना केली आहे. त्यामुळे विरोधकांकडून या घोषणेबद्दल काय भूमिका घेतली जाणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Funds cut if 'mashaal' symbol seen: Nitesh Rane taunts Thackeray.

Web Summary : Minister Nitesh Rane declared funds would be allocated based on party symbols in upcoming elections. He promised funds for BJP and Shiv Sena (Shinde faction) symbols, threatening cuts for Uddhav Thackeray's Shiv Sena (UBT). Rane emphasized Narayan Rane's leadership and development focus for the district.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण