शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी द्या पदरात, अन्यथा १२ मार्चला ओरोसच्या मैदानात!; आंबा बागायतदारांचा देवगडमध्ये एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:20 IST

५ लाखांची मदत न मिळाल्यास राजू शेट्टींची धडक मोर्चाची हाक

देवगड : कोकणचा हापूस सध्या अस्मानी आणि सुल्तानी संकटात होरपळत आहे. राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पात या शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली नाही, तर १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढला जाईल, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. देवगड-जामसंडे येथील सांस्कृतिक भवनात आयोजित आंबा बागायतदार आणि व्यापारी यांच्या भव्य ‘एल्गार मेळाव्यात’ ते बोलत होते.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!यावेळी व्यासपीठावर आंबा बागायतदार आणि व्यापारी संघटना देवगडचे अध्यक्ष काका ढोके, ज्येष्ठ आंबा बागायतदार सुधीर जोशी, नंदू शेठ घाटे व तालुक्यातील बहुसंख्य आंबा बागायतदार व व्यापारी उपस्थित होते.कोकणचा आंबा, काजू आणि मत्स्य शेतकरी हा या मातीचा खरा कणा आहे. मात्र, सध्या हाच कणा मोडून पडण्याच्या स्थितीत आहे. या वर्षीचा आंबा हंगाम मोहोर गळती, अवकाळी पाऊस आणि तापमानातील चढ-उतारामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. फळमाशीचा प्रादुर्भाव आणि कीटकनाशकांवर होणारा अवाढव्य खर्च यामुळे बागायतदार कर्जबाजारी झाला आहे. उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाल्यामुळे बागायतदारांच्या हाती काहीच उरलेले नाही.प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असून, सर्व उपाययोजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. शासकीय अनास्थेमुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटाच्या खाईत लोटला गेला असून, त्याला सावरण्यासाठी सरकारने तातडीने तिजोरी उघडणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

५ लाख हेक्टरी मदत अन् कर्जमाफीकेवळ पोकळ आश्वासने आणि सर्वेक्षणाचे खेळ आता पुरे झाले. सरकारने आगामी अर्थसंकल्पात आंबा उत्पादकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. यामध्ये हेक्टरी ५ लाख रुपयांची थेट मदत आणि शेतकऱ्यांची सर्व बँकांची थकीत कर्जे सरसकट माफ करावीत, ही आमची प्रमुख मागणी आहे.

बोगस औषध कंपन्यांची चौकशी कराबागायतदार बागा वाचविण्यासाठी लाखो रुपयांची महागडी कीटकनाशके फवारत आहेत, तरीही रोगांवर नियंत्रण का मिळत नाही? कृषी विभागाने दर्जाहीन औषधे विकून बागायतदारांची लूट करणाऱ्या औषध कंपन्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

उपाययोजना केवळ कागदावरच!आंबा संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठांनी या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर असणे अपेक्षित होते. मात्र, अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. कृषी आणि फलोत्पादन विभागाच्या योजना प्रत्यक्ष बागेपर्यंत पोहोचतच नाहीत, असा घणाघात शेट्टी यांनी केला.

देवगडमध्ये हवे अद्ययावत संशोधन केंद्रहापूसचे जागतिक केंद्र असलेल्या देवगडमध्ये अद्यापही सक्षम आणि अद्ययावत आंबा संशोधन केंद्र उपलब्ध नाही. भविष्यातील हवामान बदलाची संकटे रोखण्यासाठी येथे ‘हायटेक’ संशोधन केंद्र उभे करावे आणि बागायतदारांना मूळ किमतीत खते व औषधे उपलब्ध करून द्यावीत.

शेतीला ‘एआय’ तंत्रज्ञानाची हवी जोडआधुनिक काळात जगाची शेती बदलत आहे. हवामान बदलाचा अचूक अंदाज आणि रोगांचा प्रादुर्भाव आधीच समजण्यासाठी शेतकऱ्यांना ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावरच आपण हापूस वाचवू शकतो.

नुकसानीचा पाढा (आकडेवारी)घटक सद्यस्थिती / अंदाजितउत्पादनातील घट : ९०% ते ९५%सरासरी खर्च : १.५ लाख प्रति हेक्टरीप्रमुख मागणी : ५ लाख प्रति हेक्टरी मदतमोर्चाची तारीख : १२ मार्च, २०२६

English
हिंदी सारांश
Web Title : Mango farmers demand loan waiver or protest on March 12.

Web Summary : Mango farmers in Devgad demand immediate loan waivers and ₹5 lakh per hectare assistance due to crop losses. Raju Shetti warns of protests if demands aren't met. They cite devastation from weather and pests, demanding action against fake pesticide companies.