शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतीक्षा रविवारच्या निकालाची

By admin | Updated: October 16, 2014 22:50 IST

मतमोजणी सकाळी ८ पासून : ६५ फेऱ्या, १३८ कर्मचारी नियुक्त

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जरी पार पडली असली तरी आता साऱ्यांचेच लक्ष १९ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. तिन्ही विधानसभांची मतमोजणीही एकूण ६५ फेऱ्यांत होणार असून त्यासाठी १३८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येकी १५ टेबलवर मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी प्रत्यक्ष सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. रविवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यात विधानसभेसाठीचे मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडले. बुधवारी सायंकाळी ६ वाजता जिल्ह्यातील २४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रतीक्षा रविवारची लागली आहे. कणकवली मतदारसंघाची मतमोजणी कणकवली कॉलेज येथील एचपीसीएल सभागृहात, कुडाळची मतमोजणी सिंधुदुर्गनगरी येथील बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे तर सावंतवाडी येथील मतमोजणी सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅडमिंटन सभागृहात होणार आहे. यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी १४ टेबल्स तर पोस्टल मतमोजणीच्या तपासणीसाठी एक टेबल अशाप्रकारे प्रत्येक मतमोजणीच्या ठिकाणी १५ टेबल असणार आहेत. या टेबलवर एक राजपत्रित अधिकारी, पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक असे तीन कर्मचारी प्रत्येक टेबलवर असणार आहेत. अशाप्रकारे एकूण १३८ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी ही ६५ फेऱ्यात होणार आहे. यामध्ये कणकवली- २३ फेऱ्यात, कुडाळ- २० तर सावंतवाडीची २२ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरी १० ते १२ मिनिटांत पूर्ण होणार आहे.दुपारपर्यंत निकाल लागणाररविवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. दुपारपर्यंत सर्व मतयंत्रातील मतमोजणी पूर्ण होऊन दुपारपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार कुडाळ मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सकाळी ११.३० वाजेपर्यंत, कणकवली मतदारसंघाची दुपारी १२.३० पर्यंत तर सावंतवाडी मतदारसंघाची दुपारी १२.३० वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अशी होणार मतमोजणीकणकवली मतदारसंघातील मतमोजणी अशी असेल- पहिल्यांदा देवगड तालुक्यातील विजयदुर्ग मतदान केंद्राच्या मतपेटीपासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे. त्यानंतर वैभववाडी व कणकवली तालुक्यातील मतमोजणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. कुडाळ मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मालवण तालुक्यातील निरोम मतदान केंद्राच्या मतपेटीपासून मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर कुडाळ तालुक्यात मतमोजणी होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघातील मतमोजणीला सुरूवात वेंगुर्ले तालुक्यातील परूळे मतदान केंद्राच्या मतपेटीपासून सुरूवात होणार असून नंतर सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांची मतमोजणी होणार आहे.