डिंगणे येथे भररस्त्यात गव्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:42 IST2020-01-10T19:41:53+5:302020-01-10T19:42:53+5:30
बांदा : डिंगणे पाशीवाडी येथे भररस्त्यात चालकांना भल्या मोठ्या गव्याचे गुरुवारी सायंकाळी दर्शन झाले. यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांत भीतीचे ...

डिंगणे येथे रस्त्यावर गव्याचा भर दिवसा संचार सुरू होता.
ठळक मुद्देडिंगणे येथे भररस्त्यात गव्याचे दर्शनवाहनचालकांत भीतीचे वातावरण
बांदा : डिंगणे पाशीवाडी येथे भररस्त्यात चालकांना भल्या मोठ्या गव्याचे गुरुवारी सायंकाळी दर्शन झाले. यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डिंगणे परिसरात भर दिवसाही गवे रस्त्यावर व वस्तीत नजरेस पडत आहेत. यामुळे दिवसाढवळ्यादेखील प्रवास करणे चालकांसाठी धोकादायक बनले आहे.
या रस्त्यावर नेहमीच गवे दृष्टीस पडतात. यापूर्वी गव्यांनी बºयाच वेळा रस्ता अडविल्याचे डिंगणे उपसरपंच जयेश सावंत यांनी सांगितले. उपद्रवी प्राण्यांचा वावर वनविभागाने थांबविणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे