पोलीस ठाण्याच्या परिसरातच विनयभंग; वैभववाडीतील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:13 IST2020-01-08T19:12:07+5:302020-01-08T19:13:50+5:30

वैभववाडी : तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी गेलेल्या महिलेने पोलीस स्थानक परिसरात विनयभंग झाल्याची तक्रार केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलीसांनी ...

Violations in the Police Station area | पोलीस ठाण्याच्या परिसरातच विनयभंग; वैभववाडीतील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

पोलीस ठाण्याच्या परिसरातच विनयभंग; वैभववाडीतील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देया चौघांनी आपल्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केल्याची तक्रार महिलेची तक्रार

वैभववाडी : तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी गेलेल्या महिलेने पोलीस स्थानक परिसरात विनयभंग झाल्याची तक्रार केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलीसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवार ६ रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये गुलाबराव शांताराम चव्हाण, रंगराव फुलाजी चव्हाण, बजरंग पंडित चव्हाण, रवींद्र गुलाबराव चव्हाण यांचा समावेश आहे. वैभववाडीत राहत असलेल्या एका महिलेच्या विरोधात दुसऱ्या एका महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.

या तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी दोन्ही महिलांना सोमवारी पोलीस स्थानकात बोलविण्यात आले होते. परंतु, अर्जदार महिला चौकशीसाठी आली नव्हती. मात्र, जिच्याविरुद्ध तक्रार होती ती महिला पोलीस ठाण्यात हजर होती.

महिलेच्या त्या अर्जाच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव चव्हाण, रंगराव फुलाजी चव्हाण, बजरंग पंडित चव्हाण, रवींद्र चव्हाण हे चौघेही पोलीस स्थानकात गेले होते. त्यावेळी या चौघांनी आपल्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केल्याची तक्रार त्या महिलेने पोलिसांत दिली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Violations in the Police Station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.