शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जलसीमेचा भंग, कर्नाटकातील नौका मालवण समुद्रात घेतली ताब्यात; मत्स्य विभागाची पहाटे धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:14 IST

नौका जप्त करून आणली सर्जेकोट बंदरात

मालवण : मालवण सागरी किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील हायस्पीड ट्रॉलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.राज्याच्या सागरी हद्दीत घुसून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या अशा नौकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे यांनी सातत्याने भूमिका मांडली. त्या नंतर अनेक नौकांवर कारवाई झाली असून, सातत्याने मत्स्य विभागाकडून कारवाई सुरू आहे.१० सागरी मैल पाण्यात आढळलीबुधवार २४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मालवणसमोर अंदाजे १० सागरी मैल पाण्यात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहायय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) हे नियमित गस्त घालत होते. यावेळी कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली किशन, रा. कुमठा उत्तर कानडा, राज्य कर्नाटक यांची नौका शिवतेजा नॉ. क्र.-आयएनडी-केए-२-एमएम-५९८० द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवणसमोरील समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या प्रतिवेदनानंतर नौकेबाबत सुनावणीअंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहायक मत्स्यविकास अधिकारी (परवाना अधिकारी, मालवण) यांनी पोलिस कर्मचारी गुरुप्रसाद परब तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक, मालवण व वेंगुर्ला यांच्या सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.