नांदगाव येथील महामार्गावरील वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 18:08 IST2021-03-09T18:07:43+5:302021-03-09T18:08:56+5:30

Road Kankavli Sindhudurgnews- कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी अजून बॉक्सवेलच्या सर्व्हिस रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. नांदगाव तिठा, नांदगाव ओटव फाटा अशा ठिकाणच्या सर्व्हिस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे सर्व्हिस रस्ते न करताच पुलावरून वाहतूक सुरू करीत असल्याने नांदगाव येथे पुलावरील वाहतूक ग्रामस्थांनी रविवारी बंद केली.

The villagers blocked the traffic on the highway at Nandgaon | नांदगाव येथील महामार्गावरील वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

नांदगाव येथील पुलावरून होणारी वाहतूक रविवारी रोखण्यात आली.

ठळक मुद्देनांदगाव येथील महामार्गावरील वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

तळेरे : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी अजून बॉक्सवेलच्या सर्व्हिस रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. नांदगाव तिठा, नांदगाव ओटव फाटा अशा ठिकाणच्या सर्व्हिस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे सर्व्हिस रस्ते न करताच पुलावरून वाहतूक सुरू करीत असल्याने नांदगाव येथे पुलावरील वाहतूक ग्रामस्थांनी रविवारी बंद केली.

याबाबत सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी सांगितले, सर्व्हिस रस्त्यांच्या मागणीसाठी मी स्वत: ७ मार्च २०२० रोजी ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन केले होते. मात्र, जादा जागेच्या संपादनासाठी मोजणी करून निस मारण्यात येऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रक्रिया थांबली होती. येथील जमीन मालकांचे म्हणणे आहे की, जादा जागा संपादनाचा आम्हांला मोबदला द्या आणि सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू करा. एकाच सर्व्हिस रस्त्याने दोन्हींकडील वाहतूक सुरू असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी याबाबत लक्ष देऊन प्रशासनाने प्रश्न सोडवावा, अशी आमची मागणी आहे.

दरम्यान, रविवारी संबंधित विभागाने नांदगाव तिठ्यावरील पुलावरून वाहतूक सुरू केलेली समजताच सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, रविराज मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य गवस साठविलकर, मजीद बटवाले, बाळा सातोसे यांनी पुलावरील वाहतूक रोखली. तसेच सर्व्हिस रस्ते पूर्ण करा नंतरच पुलावरून वाहतूक सुरू करा, अशी मागणी केली.

 

Web Title: The villagers blocked the traffic on the highway at Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.