शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

विकास कुडाळकर शिवसेनेत, भाजपाला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:43 IST

भाजपला सिंधुदुर्गात मोठा धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी सोमवारी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ठळक मुद्देविकास कुडाळकर शिवसेनेत, भाजपाला धक्का विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

सिंधुदुर्ग : भाजपला सिंधुदुर्गात मोठा धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी सोमवारी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.काही दिवसांपूर्वी विकास कुडाळकर यांची पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट घेत चर्चा केली होती. यावेळी विकास कुडाळकर यांचा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर कुडाळकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला होता.

अखेर ओरोस येथील खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात विकास कुडाळकर यांनी खासदार राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.खासदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब यांच्या साथीने कुडाळ तालुक्यासह अन्य ठिकाणी शिवसेना संघटना वाढविण्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, रुची राऊत आदी उपस्थित होते.लवकरच समर्थकांचा मेळावा घेणारकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताच समर्थक कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रमसुद्धा घेण्यात येईल, असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. कुडाळकर हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपाच्या गोटात शांतता पसरली आहे. लवकरच तालुक्यातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन कुडाळकर यांनी केले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना