Sindhudurg: विनापरवाना बंदुकीसह शिकारीसाठी निघालेला एकजण ताब्यात, वेंगुर्ला पोलिसांनी केली कारवाई

By सुधीर राणे | Updated: August 9, 2023 12:13 IST2023-08-09T12:12:32+5:302023-08-09T12:13:24+5:30

वेंगुर्ला : अणसुर वादळवाडी येथे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी निघालेल्या एकास वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगेश भिकाजी गावडे, ...

Vengurla police took action after arresting a man who went hunting with an unlicensed gun | Sindhudurg: विनापरवाना बंदुकीसह शिकारीसाठी निघालेला एकजण ताब्यात, वेंगुर्ला पोलिसांनी केली कारवाई

Sindhudurg: विनापरवाना बंदुकीसह शिकारीसाठी निघालेला एकजण ताब्यात, वेंगुर्ला पोलिसांनी केली कारवाई

वेंगुर्ला : अणसुर वादळवाडी येथे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी निघालेल्या एकास वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगेश भिकाजी गावडे, (रा. अणसुरपाल, ता. वेंगुर्ला) असे संशयिताचे नाव आहे. संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

वेंगुर्ला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी काल, मंगळवारी (दि.८) रात्री अणसुरपाल भागात सापळा रचला होता. दरम्यान, मंगेश गावडे बंदूक घेऊन शिकारीला जाताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी याच्याकडून विनापरवाना बंदुक व जिवंत काडतूस जप्त केली. ही कारवाई  पोलिस निरीक्षक  अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चौहाण,  विठठल धुरी, पोलिस शिपाई अमर कांडर,  पांडुरंग खड़पकर, पोलिस हवालदार सुरेश पाटील यांनी केली.

Web Title: Vengurla police took action after arresting a man who went hunting with an unlicensed gun