शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अन् समोरची गर्दी पाहून वाजपेयी झाले होते अवाक्, आठवण अटलजींच्या सिंधुदुर्गातील एकमेव सभेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 01:27 IST

भाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले.

-अनंत जाधव सावंतवाडी - भाजपाची स्थापना झाल्यानंतर पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली होती. हा काळ साधारणता 1980 च्या दशकाचा असावा, त्यानंतर वाजपेयीची कोकणात सभा घेण्याचे ठरले. त्यावेळी रत्नागिरी ऐवजी सिंधुदुर्ग वर एकमत झाले.आणि 1982-83 च्या  दरम्यान  देवगड जामसंडेत सभा घेण्यात आली. वाजपेयी दहा तासाचा प्रवास करत मुंबई हून  कोल्हापूर मार्गे जामसंडेत आले होते. एवढ्या लांबचा प्रवास बघून वाजपेयी सहकाऱ्यांना प्रवासातच म्हणाले होते की एवढ्या लांब सभा घेता लोक येतील ना. पण सहकारी त्याना धीर देत होते. आणि जेव्हा प्रत्यक्षात वाजपेयी सभास्थळी दाखल झाले तेव्हा ते गर्दी बघून चांगलेच  अवाक झाल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपल्या राजकीय कारकिर्दीत फक्त एक वेळाच सिंधुदुर्ग मध्ये आले होते.असे ही त्यांनी सांगितले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात निधन झाले आहे.त्यांच्या निधनानंतर भाजपा नेते माधव भंडारी यांनी  वाजपेयीच्या सिंधुदुर्ग भेटीच्या आठवणी ताज्या केल्या यावेळी भंडारी म्हणाले,1980 चे दशक असावे मुंबई पक्षाची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयींची निवड झाली होती.आम्ही काही पदधिकारी जिल्हयातून वाजपेयी यांची भेट घेण्यास गेलो होतो.यावेळी राज्यातील काही नेते सोबत होते.आम्ही सिंधुदुर्गमध्ये येण्याचा  प्रस्ताव दिला तेव्हा वाजपेयीनी कोणताही संकोच न बाळगता येण्याचे मान्य केले. आम्हाला धक्काच बसला सभेची तारीख ही ठरली कुठली पुढे निवडणूक नव्हती तरी वाजपेयी 1982 -83 च्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हयात आले.येतना कार ने ते मुंबई तून कोल्हापूर मार्गे सिधुदुर्ग मध्ये येण्यास निघाले वाजपेयी कोल्हापूरातून देवगड कडे निघाले तेव्हा रस्ता तसेच आजबाजूचा परिसर बघून वाजपेयी आपल्या सहकार् याना म्हणाले.एवढ्या लांब सभा घेता लोक येतील ना तेव्हा सोबतचे सहकारी काही क्षणासाठी गप्प बसले पण नंतर वाजपेयीना धीर देत गर्दी होईल असे सांगितले प्रत्यक्षात  वाजपेयी  सभे च्या दिवशी दुपारच्या सुमारास जामसंडेत पोचले तेव्हा सभास्थळी समोरील गर्दी बघून वाजपेयी चांगलेच अवाक झाले.

सभा संपल्यानंतर तत्कालीन भाजपाचे नेते आप्पा गोगटे च्या घरी जेवण घेतले. तेथे ही त्यांनी सभेला वीस ते पंचवीस हजार लोक भर उन्हात आले होते.त्यानी आयोजकांचे कैतुक केले होते. सिंधुदुर्गच्या आठवणी जागवत किती लांबचा हा प्रवास, असे म्हणत नंतर वाजपेयी आल्या मार्गे म्हणजेच कोल्हापूर हून मुंबई कडे रवाना झाले होते. त्यानंतर दोन ते तीन वेळा रत्नागिरी मध्ये आले पण पुन्हा केव्हा ही वाजपेयीना सिंधुदुर्गमध्ये येण्याचा योग आला नाही, असे भंडारी यांनी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीsindhudurgसिंधुदुर्ग